Viral Video Saam tv
देश विदेश

Viral Video : ती किंचाळली अन् त्याचा प्लान फसला; गर्लफ्रेंडला सुटकेसमधून हॉस्टेलवर नेताना बॉयफ्रेंड अडकला, नेमकं काय घडलं?

girlfriend boyfriend Viral Video : हरियाणात गर्लफ्रेंडला सुटकेसमधून हॉस्टेलवर नेताना बॉयफ्रेंड अडकला. तरुणी किंचाळल्यानंतर तरुणाचा प्लान फसला.

Vishal Gangurde

हरिणायाच्या सोनीपत शहरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका कॉलेजच्या हॉस्टेलवर विद्यार्थ्याला गर्लफ्रेंडला सुटकेसमधून नेताना रंगेहाथ पकडलं. सुटकेसमध्ये असलेली मुलगी किंचाळल्यानंतर तरुणाचा प्लान फसला. मुलीच्या आवाजानंतर सुरक्षारक्षक धावत सुटकेसजवळ आले. त्यानंतर मुलीला सुटकेसमधून बाहेर काढले.

हरियाणामधील या घटनेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये सुटकेसजवळ काही सुरक्षारक्षक दिसत आहेत. सुटकेसच्या आजूबाजूला असलेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली. मीडिया रिपोर्टनुसार, सोनीपतच्या खासगी विद्यापीठातील हा प्रकार आहे. सुटेकसमधील विद्यार्थिनी त्याच विद्यापीठातील आहे का, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

...अन् तरुणाचा डाव फसला

सुटकेसमधील मुलगी किंचाळल्यानंतर तरुणाचा डाव फसला. सुटकेसमधील तरुणीच्या आवाजामुळे सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्याला अडवलं. सुरक्षारक्षकांनी सुटकेस उघडण्यास सांगितली. सुटकेस उघडल्यानंतर तरुणाचं कृत्य समोर आलं. सोनपतच्या शहरातील घटनेबाबत विद्यापीठाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. विद्यार्थ्याच्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणावरून अनेक मीम्स व्हायरल होत आहे.

सुटकेस प्रकरणावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एका युजरने म्हटले आहे की,'आजच्या काळात सुटकेसचा उपयोग विविध कामांसाठी होत आहे. मला ही आयडिया आवडली. पण माझं वय निघून गेलं आहे. आता या आयडियाचा फायदा नाही'. दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, 'सुटकेसचा असा प्रकार आमच्याही हॉस्टेलमध्ये झाला होता'.

सूत्रांच्या माहितीनुसार, हॉस्टेल प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणातील दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई होऊ शकते. सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक नेटकऱ्यांकडून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Maharashtra Live News Update: परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT