bjp former mla rathod marriage dispute claims Saam tv
देश विदेश

Shocking: तो महिलांना खेळणं समजतो, ४ वर्षे माझं शारीरिक शोषण...; भाजपच्या बड्या नेत्यावर बायकोचे गंभीर आरोप

bjp former mla rathod marriage dispute claims: भाजपच्या माजी आमदारावर बायकोने गंभीर आरोप केले आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी शारीरिक शोषण केल्याचा आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • भाजपचे माजी आमदार सुरेश राठोड यांच्यावर बायकोचे गंभीर आरोप

  • चार वर्षे शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे आरोप

  • सोशल मीडियावर व्हिडीओ केला पोस्ट

  • न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करण्याची दिली धमकी

हरिद्वारच्या ज्वालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश राठोड हे सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. सुरेश राठोड यांच्यावर त्यांची बायको आणि अभिनेत्री उर्मिला सनावर यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुरेश राठोड यांनी माझं शारीरिक शोषण, मानसिक त्रास दिल्याचा आणि खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे. उर्मिला सनावर यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे यामुळे खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये उर्मिला यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे न्याय मिळावा अशी मागणी केली.

सुरेश राठोड आणि उर्मिला सनावर यांच्यात दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी सुरेश राठोड यांनी अभिनेत्री उर्मिला सनावर ही माझी बायको असल्याचे सांगितले होते. पण यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी या नात्याला नकार दिला. हे दोघे गेल्या चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दीड वर्षापूर्वी त्यांनी नेपाळमध्ये गंधर्व विवाह केल्याची माहिती समोर आली होती. पण या गोंधळानंतर यावर्षी जूनमध्ये सुरेश राठोड यांनी उर्मिला माझी बायको असल्याचा दावा केला होता. पण दोन दिवसांपूर्वी राठोड यांनी या नात्याला विरोध करत लग्न केलं नसल्याचे सांगितले. सुरेश राठोड यांचे आधीच लग्न झाले आहे. राठोड यांनी त्यांना एकच पत्नी असल्याचा दावा केला. यानंतर उर्मिला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून सुरेश राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले.

उर्मिला सनावर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये त्या खूप रडताना दिसत आहे. त्यांनी आरोप केले की, 'सुरेश राठोडने माझं आयुष्य खराब केले. गेल्या चार वर्षांपासून ते माझा शारीरिक आणि मानसिक छळ करत आहेत. मी चालता फिरता मृतदेह झाला आहे. मी बऱ्याच काळापासून न्यायासाठी लढत आहे. मी त्याची बायको आहे. त्यांनी १५ जून रोजी पत्रकार परिषद घेत मी त्यांची बायको असल्याचे सांगितले होते पण आता ते मी त्यांची बायको नसल्याचे सांगत आहे. त्यांनी कधीही मला आपली बायको मानले नाही. सतत माझा छळ केला.'

तसंच, 'सुरेश राठोड यांनी अनेक महिलांचे आयुष्य खराब केले आहे. त्याच्यासाठी कुंकू एक खेळणं आहे. त्यांनी महिलांना खेळणं समजले आहे. त्याने माझे आयुष्य खराब केले. मी दोन वर्षांपासून न्यायासाठी प्रयत्न करत आहे. पण कोणच मला मदत करत नाही. मला न्याय मिळाला नाही तर मी प्रदेश कार्यालयात येऊन आत्महत्या करेल. मी कधीच विचार केला नव्हता असा व्हिडीओ बनवावा पण माझ्यावर ही वेळ आली आहे. सुरेश राठोडला त्याच्या कर्माची फळं मिळाली पाहिजे. तुला मारून टाकेल अशी धमकी तो देतो. तू जर माझ्या इकडे आली तर तुझी हत्या करून टाकेल अशी वारंवार धमकी दिली जात आहे.', असे आरोप उर्मिला राठोड यांनी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Poco C85 5G Launch: 50 मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा, 6000 mh बॅटरी; बाजारात पोकोचा धाकड सी 85 फोन लॉंच

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

SCROLL FOR NEXT