देश विदेश

Shocking: धक्कादायक! पोलिसाच्या गाडीने तरूणाला चिरडले, जागेवरच मृत्यू; ASI आणि कॉन्स्टेबलला ठोकल्या बेड्या

Delhi Accident: ही घटना रामकृष्ण आश्रम मेट्रो स्टेशनवर घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, पीसीआर व्हॅन चालकाने चुकीने अॅक्सिलरेटर दाबल्यामुळे गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या व्यक्तीला धडक दिली.

Dhanshri Shintre

  • रामकृष्ण आश्रम मेट्रो स्टेशनजवळ पीसीआर व्हॅनखाली येऊन व्यक्तीचा मृत्यू.

  • मृत गंगा राम तिवारी अपंग होते, दशकभर चहाची टपरी चालवत होते.

  • प्रत्यक्षदर्शींचा आरोप – पोलिस मद्यधुंद अवस्थेत होते.

  • आरोपी एएसआय आणि कॉन्स्टेबल निलंबित, तपास सुरु.

राजधानी दिल्लीमध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने खळबळ उडवली आहे. रामकृष्ण आश्रम मेट्रो स्टेशनजवळ दिल्ली पोलिसांच्या पीसीआर व्हॅनखाली येऊन एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंदिर मार्ग पोलीस स्टेशन परिसरात घडली असून मृत व्यक्तीचे नाव गंगा राम तिवारी असे आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, व्हॅनच्या चालकाने चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबल्यामुळे वाहनाचा ताबा सुटला. या दुर्घटनेत रस्त्याच्या कडेला झाडाखाली आपल्या चहाच्या टपरीवर झोपलेल्या गंगा राम तिवारींना व्हॅनने चिरडले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला. मृत व्यक्ती गेल्या दहा वर्षांपासून तिथे चहाची टपरी चालवत होते. विशेष म्हणजे ते अपंग होते आणि आपल्या खाण्या-पिण्यासाठी छोटेसे दुकान चालवत होते.

प्रत्यक्षदर्शी पंडित बाबू तिवारी यांनी माध्यमांशी बोलताना धक्कादायक माहिती दिली. त्यांच्या मते, अपघात घडला त्यावेळी व्हॅनमधील पोलिस मद्यधुंद अवस्थेत होते. त्यामुळे हा केवळ अपघात नसून पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे घडलेला प्रकार असल्याचे ते म्हणाले.

या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी एएसआय आणि एका कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. घटनेचा पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी सांगितले की या प्रकरणी एफआयआर नोंदवला जात आहे. तसेच संबंधितांची वैद्यकीय तपासणीही केली जाणार आहे. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या गुन्हेस्थळावर दिल्ली पोलिसांची तपास टीम शोध करत असून स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेविषयी संतापाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Crime : किरकोळ वादातून भररस्त्यात चाकू हल्ला; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

Maharashtra Live News Update: एमएससीबीच्या वायरमेनच काम करणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतले

म्हाडाकडून बंपर लॉटरी; पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर, आजच अर्ज करा

SCROLL FOR NEXT