Shocking News  Saam Tv
देश विदेश

Shocking: ५ वर्षांच्या मुलाची करामत, Amazon वरून केली ३ लाखांची शॉपिंग; आई-वडील हादरले

Shocking News: मुलाच्या हातात मोबाईल देणं पालकांना चांगलेच महागात पडले. ५ वर्षाच्या मुलाने मोबाईल हातात घेत Amazon वरून तब्बल ३ लाखांची शॉपिंग केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

५ वर्षांच्या मुलाने आपल्या पालकांना चांगलाच धडा शिकवला. मुलाच्या हातात मोबाइल देणं पालकांना चांगलेच महागात पडले. या मुलाने अमेझॉनवर तब्बल ३ लाखांची शॉपिंग केली. हे माहिती पडल्यानंतर त्याच्या आई-वडिलांना मोठा हादरा बसला. या मुलाने रात्री अमेझॉनवर २.५८ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंची खरेदी केली. मुलाने केलेल्या प्रतापाचा व्हिडीओ तयार करून त्याच्या आईने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर शेअर केला. या व्हिडीओला आतापर्यंत ४२ लाख युजर्स मिळाले आहेत.

आपल्या मुलाने केलेला प्रताप क्रिस्टन लॉसेस मॅकलॉन नावाच्या महिलेने सोशल मीडियावर शेअर केला. तिने टिकटॉकवर याचा व्हिडीओ तयार करून शेअर केला. व्हिडिओमध्ये मुलाचे वडील त्याला विचारतात, 'तू अमेझॉनवरून सात गाड्या मागवल्या आहेत. आज तू २.५८ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी केली आहेस. तू हे सर्व कसं केलंस? आता तू मोठ्या संकटात आहेस.'

वडिलांनी प्रश्न विचारल्यानंतर मुलगा त्याच्या भावंडांमध्ये शांतपणे बसतो आणि काहीच उत्तर देत नाही. व्हिडिओमध्ये नंतर ऑर्डरचे स्क्रीनशॉट देखील दाखवले आहेत. ज्यामध्ये लिहिले आहे की, 'सर्वजण झोपलेले असताना हा छोटासा मुलगा आनंदाने स्क्रोल करत होता आणि गोष्टी ऑर्डर करत होता.'

क्रिस्टनने पुढे सांगितले की, जेव्हा तिने मुलाला पकडले तेव्हा त्याच्या कार्टमध्ये अजूनही ५८,००० रुपये किमतीच्या वस्तू होत्या आणि तो चेकआउट करणार होता. म्हणजेच तो एकूण ३ लाख रुपये किमतीची खरेदी करणार होता. हे पाहून आम्हाला धक्का बसला.' मुलाच्या आईने त्याला गमतीने म्हटले की, 'त्याने 'जुलैमधील ख्रिसमस' एका नवीन पातळीवर नेला. मी Amazon सोबत फोनवर रडत रडत बोलत आहे आणि परतफेड मागत आहे आणि माझा नवरा बँकेसोबत बोलत आहे.' हा व्हिडिओ टिकटॉकवर ४२ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

या व्हिडीओवर युजर्स मजेशीर कमेंट्स कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटिझन्सकडून प्रतिक्रियांचा पूर आला आहे. मुलाने केलेल्या शॉपिंगचा किस्सा ऐकून नेटकरी पोट धरून हसत आहेत. एका युजर्सने विनोदी कमेंट केली, 'तुमच्या खात्यात इतके पैसे होते याचा मला हेवा वाटतो. माझे कार्ड नाकारले गेले असते.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'हे त्या पालकांसाठी धडा आहे जे त्यांच्या मुलांना फोन देतात आणि त्यांची सुटका करतात.' दुसऱ्या यजरने लिहिले की, 'मुलांना दोन मोबाईल फोन द्या.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT