Uttarpradesh Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : धक्कादायक! पिझ्झा शॉपमध्ये डेटला गेले, जातीवरून हिणवलं; प्रेमी युगुलांनी थेट दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

Uttarpradesh Crime News : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात पिझ्झा शॉपमध्ये जात विचारून चौकशी केल्याने घाबरलेल्या प्रेमी युगुलाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून उपचार सुरू आहेत.

Alisha Khedekar

  • पिझ्झा शॉपमध्ये जात विचारली

  • भीती व बदनामीच्या कारणाने प्रेमी युगुलाची उडी

  • दोघेही गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पिझ्झा शॉपमध्ये बसलेल्या प्रेमी युगुलाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे या दोघांना काही लोकांनी जात विचारल्याने घाबरून त्यांनी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात बरेली मोरजवळील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक पिझ्झा शॉप आहे. या शॉपमध्ये शनिवारी संध्याकाळी एक तरुण आणि त्याच्यासोबत त्याची प्रेयसी देखील आली होती. त्यांनी नूडल्स ऑर्डर केले होते आणि ते येतील याची ते वाट पाहत बसले होते. या दरम्यान काहीजण तिथे आले आणि त्यांनी त्यांची चौकशी सुरू केली.

त्यांनी तरुण तरुणीला त्यांची जात विचारली. यानंतर ते दोघेही घाबरले. घाबरून त्या दोघांनी त्यांनी हिंदू असल्याची कबुली दिली. मात्र गुंडगिरी करणाऱ्या काही तरुणांनी मोबाईल काढून चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. आपली बदनामी होऊ शकते या कारणाने तरुणाने घाबरत दुसऱ्या मजल्यावर बाजूला असलेली खिडकी उघडली आणि खाली उडी मारली. पेचात सापडलेल्या तरुणीने देखील बॉयफ्रेंडच्या मागोमाग घाबरत खिडकीतून उडी मारली. या दुर्घटनेत दोघांनाही गंभीर दुखापत झाली.

जखमी झालेल्या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. सध्या या प्रकरणी कोणतीही लेखी तक्रार आलेली नाही. लेखी तक्रार येताच आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: तरुणीने एक्स बॉयफ्रेंडच्या बायकोला दिलं HIV इंजेक्शन, लग्नाला नकार दिल्याचा राग डोक्यात गेला

No Makeup Look Tips: सेलिब्रिटींसारखा नो मेकअप लूक कसा करायचा? वापरा या सोप्या टिप्स

Maharashtra Live News Update: शिंदेसेनेच्या विजयी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची घेतली भेट

पराभवानंतर राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर, मनसेमध्ये लवकरच होणार फेरबदल

Cholesterol : महत्वाची बातमी! कोलेस्ट्रोल कमी करणारे पदार्थ कोणते? उत्तर स्वयंपाकघरातच दडलंय; जाणून घ्या यादी...

SCROLL FOR NEXT