NIGERIA ATTACK: 17 FARMERS KILLED, 13 INJURED IN BRUTAL GUNMEN ASSAULT IN ZAMFARA STATE Saam Tv
देश विदेश

Shocking : भयंकर! बाईकवरून आले अन् शेतात घुसले; शेतकऱ्यांवर बंदूक रोखून १७ जणांची हत्या केली; १३ गंभीर

Nigeria's Crime News : नायजेरियातील झामफारा राज्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्लेखोरांनी गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

Alisha Khedekar

  • झामफारा राज्यातील गोरॉन नामाये गावात शेतकऱ्यांची हत्या

  • हल्ल्यात १७ शेतकऱ्यांचा मृत्यू तर १३ जण गंभीर

  • वाढत्या हिंसाचारामुळे नायजेरियातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित

  • अतिरेक्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी

नायजेरियामध्ये वाढत्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये आणखी एका भीषण हल्ल्याची भर पडली आहे. नायजेरियातील झामफारा राज्यात हल्लेखोरांनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करत १७ जणांची निर्घृण हत्या केली, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी झामफारा राज्यातील मराडून भागातील गोरॉन नामाये गावात घडली. शेतकरी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत असताना अचानक बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.या भीषण हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या १७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले.

मराडून स्थानिक प्रशासनाचे अध्यक्ष सुनासी दोसारा यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सुरक्षा यंत्रणांना मराडून जंगलातील बायान-रुवा परिसरातील अतिरेक्यांच्या तळांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नायजेरियामध्ये गेल्या काही वर्षांपासून सशस्त्र टोळ्या, बंडखोर गट आणि खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांच्या कारवायांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीलाही सोकोटो राज्यात दोन दिवसांत झालेल्या हल्ल्यांमध्ये किमान ३७ जणांचा मृत्यू झाला होता. सततच्या हिंसाचारामुळे हजारो लोकांचा जीव गेला असून लाखो नागरिकांना आपली घरे सोडून स्थलांतर करावे लागले आहे. सरकार आणि सुरक्षा यंत्रणांसमोर या वाढत्या दहशतीवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंब्रामध्ये शाळेची संरक्षण भीत कोसळली, घटना CCTv मध्ये कैद.

Singer Death : संगीत विश्वातील प्रसिद्ध आवाज हरपला; पद्मविभूषण विजेत्या ज्येष्ठ गायिकेचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Thane : ठाण्यातील धक्कादायक घटना! पोटच्या मुलाला आईने केली अमानुष मारहाण; चटके दिले अन्...

Monsoon Tips : पावसाळ्यात कपड्यांचा कुबट वास घालवण्यासाठी करा हे सोपे उपाय

Next Solar Eclipse India: भारतात पुढचे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी दिसणार? जाणून घ्या तारीख आणि महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT