Gujrat Bharuch Crime News Saam Tv
देश विदेश

Crime News : अल्पवयीन मुलगी दीड महिन्यांची गरोदर; खासगी क्लासमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाने जबरदस्ती केली अन्...

Gujrat Bharuch Crime News : गुजरातच्या भरूच जिल्ह्यात खासगी क्लासच्या शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे पीडित मुलगी दीड महिन्यांची गरोदर होती. याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • गुजरातमध्ये शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना

  • खासगी ट्यूशन शिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप

  • गर्भधारणेमुळे घृणास्पद प्रकार उघडकीस

  • आरोपी शिक्षक अटकेत

गुजरातमधील भरूच जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ६३ वर्षीय खासगी ट्यूशन शिक्षकाने १३ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार केला. निष्पाप विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याने हे घृणास्पद कृत्य उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी काही काळापासून ६३ वर्षीय आरोपी शिक्षिकेकडे ट्यूशनसाठी जात होती. आरोपी शिक्षिकेने मुलीला शिकवण्याच्या बहाण्याने तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर रविवारी एक्स्ट्रा क्लासेसच्या बहाण्याने तिला बोलावू लागला. या काळात मुलीला एकट्यात गाठून नराधम शिक्षक तिचे लैंगिक शोषण करत राहिला.

यादरम्यान शिक्षकाने जर तू कोणाला सांगितल तर, गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी पीडितेला दिली. भीतीमुळे, मुलगी बराच काळ गप्प राहिली. मात्र काही दिवसांनी तिची तब्बेत बिघडली. तिच्या आईने तिला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तिला गरोदर असल्याचे सांगितले. हे ऐकून पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. पीडितेला विश्वासात घेऊन तिच्या आईने घडलेला प्रकार वदवून घेतला.

घडलेला प्रकार समजताच मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून सविस्तर तपास सुरु आहे. दरम्यान या घटनेने पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी २.३० पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

Rahul Gandhi speech : "अमित शाह यांनीच गोळीबाराचा आदेश दिला," राहुल गांधींचा थेट आरोप; रिजिजू म्हणाले माफी मागा, नाहीतर...

SCROLL FOR NEXT