Parliament Security Breach Saam TV
देश विदेश

Parliament Security Breach: 'शॉक दिला, मारहाण केली, खोट्या सह्या घेतल्या...', संसद सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपींचा गंभीर आरोप

Parliament Security: विरोधी पक्षातील नेत्यांशी आमचे संबंध नसतानाही आमचे त्यांच्याशी संबंध आहेत असे आमच्याकडून कबूल करण्यास भाग पाडले जात आहे, असे आरोप या ५ आरोपींनी पोलीसांवर केलेत.

Ruchika Jadhav

Delhi Police:

संसदेतील सुरक्षा भंग केल्याप्रकरणी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आपली बाजू मांडत असताना यातील ५ आरोपींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्ली पोलीस आमचा छळ करत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांशी आमचे संबंध नसतानाही आमचे त्यांच्याशी संबंध आहेत असे आमच्याकडून कबूल करण्यास भाग पाडले जात आहे, असे आरोप या ५ आरोपींनी पोलीसांवर केलेत.

काल झालेल्या सुनावणीवेळी मनोरंजन डी, सागर शर्मा, ललित झा, अमोल शिंदे आणि महेश कुमावत यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरदीप कौर यांच्यासमोर युक्तिवादावेळी आपलं म्हणणं मांडलं. यावर न्यायमूर्तींनी या सहाही आरोपींची न्यायालयीन कोठडी आणखी १ मार्चपर्यंत वाढवली आहे.

आरोपींना विजेचा शॉक

पाचही आरोपींनी कोर्टात पुढे सांगितले की, आमच्याकडून जळपास ७० कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या आहेत. यासाठी आमचा मोठ्याप्रमाणावर छळ करण्यात आला. आम्हाला विजेचा शॉकही देण्यात आला. 'बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा' (UAPA) अंतर्गत गुन्ह्यांची कबुली देण्यासाठी आणि विरोधी राष्ट्रीय राजकीय पक्षांशी आमचे संबंध आहेत अशी माहिती देण्यासाठी आम्हाला भाग पाडलं गेलं, असं ५ आरोपींनी म्हटलं आहे.

न्यायालयाने या पाचही जणांचे म्हणणे ऐकले असून यावर पोलिसांकडून उत्तर मागवले आहे. तसेच पुढील सुनावणीसाठी १७ फेब्रुबारी ही तारीख दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या वागणुकीबाबत या पाचही आरोपींनी संयुक्त याचिका दाखल केली आहे. सहावी आरोपी नीलम आझादने देखील असेच आरोप करत अर्ज दाखल केला आहे. मात्र तिचा अर्ज न्यायालयात प्रलंबित आहे. पॉलीग्राफ/नार्को/ब्रेन मॅपिंग दरम्यान मला विरोधकांशी संबंध असल्याचे म्हणण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला गेला असं तिने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बनावट ऑनलाईन अ‍ॅप प्रकरणात चौकशीत नसतानाही शेटे यांचे आत्महत्येचं पाऊल

Divya Deshmukh Chess World Cup : दिव्या देशमुख बनली वर्ल्ड चॅम्पियन! नागपूरच्या १९ वर्षीय लेकीनं घडवला इतिहास

Brain Exercises: मेंदूला तीक्ष्ण करण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करा 'या' ब्रेन ॲक्टिव्हिटिज

Thane Traffic : घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढली; जाणून घ्या कारण

Gokak Waterfalls: सांगलीपासून २ तासांच्या अंतरावर आहे 'हा' धबधबा; गर्दी नको असेल तर आहे परफेक्ट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT