Kolkata Shocking News Saam Tv
देश विदेश

Kolkata Shocking News : कोलकाता पुन्हा हादरलं! प्रसिद्ध इन्स्टिट्यूटच्या बॉइज हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार; आधी बेशुद्ध केलं, नंतर...

Kolkata News : आयआयएम कोलकाता येथे एका विद्यार्थिनीवर वसतिगृहात बलात्कार झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. समुपदेशनाच्या नावाखाली तिला बोलावून अमली पदार्थ देत अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

कोलकातामधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोलकात्यातील प्रसिद्ध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) येथे एका विद्यार्थिनीवर कॅम्पसमध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने समुपदेशनाच्या नावाखाली मुलीला वसतिगृहात बोलावले आणि नंतर तिच्या जेवणात आणि पेयांमध्ये अमली पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने शुक्रवारी संध्याकाळी हरिदेवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे की, दुसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने तिला समुपदेशन सत्राच्या बहाण्याने मुलांच्या वसतिगृहात बोलावले. तिथे तिला पिझ्झा आणि सॉफ्ट ड्रिंक्स देण्यात आले, त्यानंतर ती बेशुद्ध पडली. जेव्हा मुलीला शुद्ध आली तेव्हा ती वसतिगृहात होती आणि तिच्यावर बलात्कार झाला असल्याचं तिने पोलीस तक्रारीत म्हटलं.

मुलीने असेही म्हटले आहे की, आरोपीने तिला धमकी दिली आणि म्हटले की जर तिने कोणाला सांगितले तर त्याचे परिणाम भयानक होतील.दरम्यान पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस या घटनेचा अधिकचा तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना दक्षिण कोलकत्तामधील लॉ कॉलेज मध्ये घडली होती. लॉ कॉलेजमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराचा हा प्रकार २५ जून रोजी घडला. ज्यामध्ये ३० जून रोजी पोलिसांनी १२ तासांच्या आत तीन मुख्य आरोपींना अटक केली. आता त्या प्रकरणातील चारही आरोपी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यभर तुमच्यावर पडेल पैशाचा पाऊस, फक्त या ७ गोष्टी फॉलो करा! चाणक्य निती काय सांगते?

Chameleon: सरडा एका दिवसात किती वेळा रंग बदलतो?

Today Horoscope : नोकरीत प्रमोशन अन् व्यवसायात मिळणार यश; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Maharashtra Live News Update: यवतमाळनंतर आता चिपळूणमध्येही टीडब्ल्यूजेच्या चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Face Care Tips: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किनसाठी सकाळी उठल्यावर चेहरा या घरातील सामग्रीने करा स्वच्छ, आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT