Shoaib Malik Sana Javed video  Saam tv
देश विदेश

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Shoaib Malik Sana Javed video : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार असल्याची चर्चा रंगली आहे. एका व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

शोएब मलिक आणि सना जावेद यांच्यातील मतभेदाची चर्चा

व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण.

व्हिडिओमध्ये शोएब मलिकची पत्नी सना नाराज असल्याचे स्पष्ट

शोएब आणि सना यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा पूर्वाश्रमीचा पती आणि पाकिस्तानाचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक पु्न्हा एकचा चर्चेत आला आहे. शोएब मलिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. शोएब मलिक आणि सनाने २०२४ सालच्या जानेवारीत लग्न केलं. मात्र, आता दोघांच्या नात्यात कटुता झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. दोघांचं नात्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे.

शोएब मलिक आणि सना जावेदचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघे एका कार्यक्रमात एकमेकांच्या बाजूला बसले आहेत. मात्र, दोघे एकमेकांशी बोलताना दिसत नाही. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

शोएब मलिक आणि सना जावेदने २०२४ सालच्या जानेवारीत दोघांचं लग्न झालं. त्यानंतर सानियाच्या कुटुंबीयांनी सानिया मिर्झाचा घटस्फोट झाल्याचं समोर आलं होतं. शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाआधी त्याच्या दुसऱ्या घटस्फोटाची चर्चा होती. शोएब आणि सानिया मिर्झाचं नातं १४ वर्ष टिकलं. त्यानंतर सानियाशी घटस्फोट घेऊन शोएबने सना जावेदशी लग्न केलं.

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, शोएब मलिक आणि सना मलिकच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. सना जावेद अनेक सामन्यात शोएब मलिकला सपोर्ट करण्यासाठी यायची. मात्र, दोघांच्या नात्यात कटुता आल्याचं बोललं जात आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?

दोघे एका कार्यक्रमात एकमेकांच्या आजूबाजूला बसले आहेत. शोएब त्याच्या चाहत्याला ऑटोग्राफ देत आहे. तर सना जावेदने दुसरीकडे तोंड केलं आहे. या व्हिडिओमध्ये सना जावेदच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायला मिळत आहे.

शोएब आणि सना जावेदच्या व्हायरल व्हिडिओमुळे जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. या व्हायरल व्हिडिओवर काही चाहत्यांचं म्हणणं आहे की, दोघांमधील सामान्य मतभेद असावेत. मात्र, शोएब आणि सना जावेदने या व्हायरल व्हिडिओवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Force Plane Crash: मोठी दुर्घटना! 110 सैनिकांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान क्रॅश, उड्डाण घेताच जमिनीवर कोसळलं

Dhurandhar-2: चित्रपटातील एका सीनचं शुटिंग संपल्यानंतर हमजा, रहमान डैकेतसह मेजर इक्बालही ढसाढसा रडला, काय आहे कारण?

Vasant More: वसंत मोरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार; न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला,काय आहे प्रकरण?

Maharashtra Live News Update: राज्यसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांची बिनविरोध निवड

साताऱ्यात लोकशाहीची पायमल्ली; जिल्हा परिषद निवडणुकीत हायव्होल्टेज राडा

SCROLL FOR NEXT