Supreme Court Hearing Today Shivsena Uddhav Thackeray Mashal Symbol Saam TV
देश विदेश

Supreme Court Hearing: ठाकरे गटाचे मशाल चिन्ह जाणार की राहणार? सुप्रीम कोर्टात आज महत्वपूर्ण सुनावणी

Uddhav Thackeray Mashal Symbol: ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेतला असून सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्रमोद जगताप, साम टीव्ही

Supreme Court Hearing Mashal Symbol: शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण, ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने दिलेलं मशाल पक्षचिन्हावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. ठाकरे गटाला देण्यात आलेल्या मशाल चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेतला असून सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

सत्तासंघर्षाच्या काळात केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षनाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला दिलं. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटाला‘मशाल’ चिन्ह मिळाले. पण समता पक्षानेही या चिन्हावर दावा केल्याने ठाकरेंच्या अडचणीत अजूनच वाढ झाली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेल्या 'धगधगती मशाल' चिन्हावर दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीनेही दावा केला आहे. १९९६ पासून हे चिन्ह आपल्याकडे असल्याचे सांगत समता पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यापूर्वी समता पक्षाने दावा करत दिल्ली हायकोर्टात याचिका केली होती.

मात्र, त्यांची ही याचिका फेटाळून लावण्यात आली. आता पुन्हा समता पक्षाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून यावर आज म्हणजेच १७ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत नेमकं काय होतं? याकडे उद्धव ठाकरे गटातील नेत्यांसह शिवसैनिकांचं लक्ष लागून आहे.

निवडणूक आयोगाचे म्हणणे काय?

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेले 'मशाल' हे चिन्ह अंतरिम स्वरूपाचे नाही. अंधेरी पोटनिवडणुकीनंतर त्याच्या पुनर्वाटपाबाबत विचार केला जाऊ शकतो, असं उत्तर निवडणूक आयोगाने समता पक्षाला दिले होते. मात्र, उत्तराचे समाधान न झाल्याने समता पक्षाने कोर्टात धाव घेतली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election : महाडनंतर रोह्यात वाद उफाळला; भाजप कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

Maharashtra Nagar Parishad Live : मतदानला शेवटचे काही मिनिटे शिल्लक असताना मतदारांची धावपळ

Mansi Naik Photos: हॉट अन् बोल्ड मानसी नाईक, फोटो पाहून घायाळ व्हाल

Modi Government: मोदी सरकारच्या प्रशासकीय रचनेत मोठे बदल; राजभवनांसह PMOचं नाव बदललं

मतदान केंद्राबाहेर छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी|VIDEO

SCROLL FOR NEXT