Rahul shewale and uddhav Thackeray  saam tv
देश विदेश

'उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करायला तयार होते, पण...'; खासदार राहुल शेवाळे यांचा गौप्यस्फोट

शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. सेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : शिवसेनेला (ShivSena) आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) उपस्थितीत त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. सेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. (Shivsena Political Crisis News In Marathi )

राहुल शेवाळे म्हणाले, 'आम्ही सर्व खासदारांनी शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. त्यानंतर प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. २०१९ साली उद्धव ठाकरेंनी वचननामा बनवला होता. त्यात देशाचे संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिलं होतं. सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी शिवसेना-भाजप एकत्र राहतील. राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला पाठिंबा. एनडीएला संधीसाठी युती महत्वाची . सक्षम विचार करून निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना संधी मिळावी, यासाठी युती महत्वाची होती. या बाबी नमूद होत्या'.

'मात्र, दुर्दैवाने महाविकास आघाडी झाली. या आघाडीच्या कॉमन अजेंडामध्ये शिवसेनेच्या वचननाम्याचा उल्लेख नव्हता. तर या कॉमन अजेंडामध्ये संभाजीनगरचा नामांतराचाही उल्लेख नव्हता. स्वत: शरद पवारांनी संभाजीनगरचा विषय कॉमन अजेंडामध्ये नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. त्यांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं आहे. त्यांचं धोरण आम्ही स्वीकारलं आहे. या नेतृत्वाच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय घेतला आहे', असे राहुल शेवाळे म्हणाले.

'आयुष्यभर आमची लढाई काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होती. त्यात महाविकास आघाडीमुळे कामकाजात अनेक तांत्रिक अडचण येत होत्या. आम्हाला राज्याच्या नगरविकास खात्याने नेहमी सहकार्य केलं. तांत्रिक अडचणी येताना आम्ही सर्व बाबी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे मांडत होतो. मात्र, पक्षाने जो वेळ द्यायला हवा होता, तो वेळ आम्हाला दिला नाही. त्यामुळे हा निर्णय घेत आहोत', असे ते म्हणाले.

'उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सांगितले होते की, माझ्या परीने सर्व प्रयत्न युतीसाठी करण्यात आले आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आता तुम्ही युतीसाठी प्रयत्न करा. त्यानंतर चार-पाच खासदारांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो. देवेंद्र फडणवीसांना भेटलो. त्यानंतर आजची भूमिका स्पष्ट केली. पक्षप्रमुखांकडून काही पूर्तता न झाल्याने भाजपचे पक्षश्रेष्ठी नाराज होते. उद्धव ठाकरे म्हणायचे की, मी भाजपसोबत युती करायला तयार आहे. पण तसं सहकार्य मिळत नव्हतं', असे राहुल शेवाळे म्हणाले.

'मात्र, दुसरीकडे संजय राऊत यांच्याकडून उपराष्ट्रपतिपदासाठी मार्गरेट अल्वा यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी म्हणून देखील चार वर्ष काम केलं आहे. त्यांना पाठिंबा देण्याऐवजी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला हवा होता. त्यामुळे १२ खासदारांनी सदर भूमिका घेतली. उद्धव ठाकरेंकडून सहकार्य मिळालं नाही, तर संजय राऊतांकडून महाविकास आघाडीचा कार्यक्रम राबविण्यात येत होता. त्यामुळे शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे', असे खासदार राहुल शेवाळे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

SCROLL FOR NEXT