punjab  saam tv
देश विदेश

Crime News : होळीच्या दिवशी रक्तरंजित राडा; शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

shiv sena leader killed : पंजाबमध्ये होळीच्या दिवशी रक्तरंजित राडा झालाय. शिवसेना नेत्याची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

होळीच्या दिवशी पंजाबमध्ये रक्तरंजित राडा झाला. पंजाबच्या मोगामध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंगत राय मंगा गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसाठी काम करत होते. मंगत हे गुरुवारी रात्री १० वाजता दूध आणायला गेले. त्याचवेळी तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

अज्ञातांनी गोळीबार केला. त्यावेळी एका ११ वर्षीय मुलाला गोळी लागली. त्यानंतर दुचाकी सोडून मंगत राय मंगा यांनी गोळीबार करणाऱ्यांचा पाठलाग केला. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर गोळीबार करणारे घटनास्थळावरून फरार झाले.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी मंगत यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मंगत यांना मृत घोषित केले. तर ११ वर्षीय जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी मुलाला सुरुवातीला मोगा शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

विश्व हिंदू शक्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोंगिदर शर्मा यांनी सांगितलं की, 'मंगत राय मंगा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

मंगत राय मंगा यांच्या मुलीने सांगितलं की, 'माझे वडील रात्री आठ वाजता दूध आणायला घराबाहेर गेले होते. त्यानंतर नेमकं काय झालं, माहीत नाही. त्यानंतर अकरा वाजता माहिती मिळाली की, वडिलांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही त्यासाठी काहीही करायला तयार आहोत'.

गुरुवारी रात्री ९ वाजता मोगा येथे दुचाकीवरील तिघांनी एका सलून मालकावर गोळीबार केला. केस कापायचे आहेत, असं सांगून सलूनमध्ये शिरले. त्यानंतर त्यांनी सलून मालकावर गोळीबार केला. सलून मालकावर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी सलून मालकाच्या पायाला लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

डीएसपी सिटी रविंदर सिंह यांनी सांगितलं की, एकाच वेळी दोन ठिकाणी गोळीबार झाला. बागेआना वस्तीत एका सलूनमध्ये गोळीबार झाला. त्यात एक जण जखमी झाला. तर दुसरी गोळीबाराची घटना ही स्टेडिअयम रोडवर झाली. त्यात मंगत राय मंगा यांच्यावर गोळीबार झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवगृहात ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati News: अमरावती रुग्णालयातील स्फोटाचा VIDEO समोर, ३ नवजात बाळांचा झाला होता मृत्यू

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

राज्यसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये मोठा भूकंप होणार? अनेक नेते बदलणार पक्ष;बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

तुम्हीही दिवसभर एकाच जागी बसून काम करता? आरोग्यावर होऊ शकतात 5 गंभीर परिणाम; वेळीच घ्या काळजी

Thursday Horoscope: या 3 राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास; पैशांपासून कामाच्या संधीपर्यंत मिळणार मोठी खुशखबर!

SCROLL FOR NEXT