Holi Crime News
Holi Crime NewsCanva

Crime News : 'रंग नका लावू..' नकार जीवावर बेतला, होळी खेळणाऱ्या तिघांनी गळा दाबला अन्..

Rajasthan News : राजस्थानमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रंग लावण्यास नकार दिल्याने तिघांनी रागाच्या भरात एका तरुणाला मारहाण केली. त्यांनी तरुणाचा गळा दाबून त्याचा जीव घेतला.
Published on

Holi 2025 : होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. देशभरात ठिकठिकाणी धुळवड, रंगपंचमी देखील साजरी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण राजस्थानमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागले आहे. होळीच्या आधी रंग लावू नका असे म्हणणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या दौरा जिल्ह्यातल्या रालावस गावात ही घटना घडली आहे. रालावस गावात हंसराज या २५ वर्षीय तरुण ग्रंथालयामध्ये स्पर्धा परिक्षेची तयारी करत होता. त्याच दरम्यान गावातील अशोक, बबलू आणि कालूराम हे तिघे हंसराजला होळीचा रंग लावण्यासाठी ग्रंथालयामध्ये घुसले. मला रंग लावू नका असे म्हणत हंसराजने रंग लावण्यास विरोध केला.

या गोष्टीचा अशोक, बबलू आणि कालूराम यांना खूप राग आला. रागाच्या भरात तिघांनी मिळून हंसराजला लाथाबुक्यांनी आणि बेल्टने मारहाण केली. त्यानंतर तिघांपैकी एकाने हंसराजचा गळा दाबून त्याचा खून केला. या घटनेचा हंसराजच्या कुटुंबातील नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी निषेध करत आंदोलन केले.

Holi Crime News
Satish Bhosale : खोक्या भोसलेला ७ दिवसांची पोलीस कोठडी, तरुणाला मारहाण करणं भोवलं

बुधवारी हा प्रकार घडला. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्रीपासून गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन केले. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी, मृत हंसराजच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची भरपाई द्यावी आणि त्याच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.

Holi Crime News
Nashik Crime : भाजप पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पिस्तुलाचा धाक दाखवत केला अत्याचार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com