Political News Saam Tv
देश विदेश

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका, 26 नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश; वाचा संपूर्ण यादी

हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

वृत्तसंस्था

शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये, प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस धरमपाल ठाकूर खांड यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेस (Congress) नेते आणि सदस्यांनी भाजप प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी काँग्रेसच्या एकूण २६ नेत्यांनी सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी सुधन सिंह यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी शिमलाचे भाजपचे उमेदवार संजय सूदही उपस्थित होते.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्यांमध्ये काँग्रेसचे माजी सरचिटणीस धरमपाल ठाकूर, माजी सचिव आकाश सैनी, माजी नगरसेवक राजन ठाकूर, माजी जिल्हा उपाध्यक्ष अमित मेहता, मेहेरसिंग कंवर, युवक काँग्रेसचे राहुल नेगी, जय माँ शक्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जोगिंदर ठाकूर, नरेश वर्मा, चम्याना वॉर्ड सदस्य योगेंद्र सिंग, टॅक्सी युनियन सदस्य राकेश चौहान, इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज शिमला अध्यक्ष धर्मेंद्र कुमार, वीरेंद्र शर्मा, राहुल रावत, सोनू शर्मा, अरुण कुमार, शिवम कुमार आणि गोपाल ठाकूर यांचा समावेश आहे.

एवढेच नाही तर चमन लाल, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव देवेंद्र सिंग, महेंद्र सिंग, माजी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मुनीश मंडला, बाळकृष्ण बॉबी, सुनील शर्मा, सुरेंद्र ठाकूर, संदीप समता आणि रवी यांनीही सोमवारीच भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या सर्वांचे भाजपमध्ये जोरदार स्वागत केले. यावेळी ते म्हणाले की, भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी एकत्र काम करूया.

यापूर्वी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या विजयावर विश्वास व्यक्त करत सांगितले की, राज्यातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यांनी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे कौतुक केले. हिमाचल प्रदेशमध्ये १२ नोव्हेंबरला मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT