Political Equations Shift in Bihar saam tv
देश विदेश

मुख्यमंत्र्यांनी डाव टाकला! दोन शिक्षक पदवीधर आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; कुठे झाली राजकीय उलथापालथ?

Rahul Raj Banshidhar Brajwasi Join Bjp In Bihar: बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड! अपक्ष विधानपरिषद आमदार राहुल राज आणि बंशीधर ब्रजवासी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने टाकलेल्या या राजकीय डावामुळे बिहारमधील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

Omkar Sonawane

बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. दोन अपक्ष विधानपरिषदेच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये सारण मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले राहुल राज आणि तिरहुत पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवलेले बंशी धर ब्रजवासी यांचा समावेश आहे. या दोघांच्या भाजप प्रवेशामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

अगदी दोन दिवसांपूर्वी शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे निकाल समोर आले. यामध्ये भाजपने मोठी मुसंडी जरी मारली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात आणि नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. तर अनेक ठिकाणी मित्रपक्षच विरोधात उभे असल्याने देखील भाजपला नुकसान झाले. मात्र निवडणुकीनंतर भाजपने बिहारमध्ये मोठा डाव टाकत अपक्ष निवडून आलेल्या आमदारांना गळाला लावले आहे. राहुल राज यांचा भाजपमध्ये प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. कारण त्यांनी सारण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या JDU चे उमेदवार आनंद पुष्कर यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर भाजपने त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते.

भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्यापूर्वी राहुल राज यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट घेतली. यावेळी सारणचे भाजप खासदार राजीव प्रताप रुडीही उपस्थित होते. राहुल राज यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले.

भाजपमध्ये प्रवेश करणारे दुसरे विधान परिषद सदस्य बंशीधर ब्रजवासी आहेत. त्यांनी तिरहुत पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवला होता. या निवडणुकीच्या मतमोजणीत बंशीधर ब्रजवासी यांना एकूण 31 हजार 832 मते मिळाली होती. तर एनडीएचे उमेदवार अभिषेक झा यांना 22 हजार 685 मते मिळाली होती. अशा प्रकारे ब्रजवासी यांनी 9 हजार 147 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगरचा 23 KMचा प्रवास पूर्ण होणार अवघ्या काही मिनिटात, पहिली आणि शेवटची फेरी किती वाजता? जाणून घ्या मेट्रो -3 चं वेळापत्रक

Maharashtra News Live Update: बाजारात भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ

IMD Weather Alert: सावधान! परत आणखी एक चक्रीवादळ येतंय; 'या' राज्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस

आधी पोलिसाला धमकी, नंतर अंगावर BMW घालण्याचा प्रयत्न; महिलेची मुजोरी

Jio Recharge: स्वस्तात मस्त! Jio चा भन्नाट रिचार्ज, फक्त १४७ रुपयांत मिळवा भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT