Sheikh Hasina Saam Tv
देश विदेश

Bangladesh Elections: शेख हसीना यांची चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी निवड, विरोधी पक्षांनी निवडणुकीवर टाकला होता बहिष्कार

Sheikh Hasina News: अवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना यांची चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी निवड झाली. बांगलादेशात मतदान संपले असून मतमोजणी सुरू आहे.

Satish Kengar

Sheikh Hasina Elected as Prime Minister of Bangladesh for Fourth Time, Opposition Parties Boycotted Election:

अवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना यांची चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधानपदी निवड झाली. बांगलादेशात मतदान संपले असून मतमोजणी सुरू आहे. मात्र सत्ताधारी अवामी लीगने 50 टक्क्यांहून अधिक जागा काबीज केल्या आहेत.

बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुका रविवारी पार पडल्या. या निवडणुकीवर मुख्य विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) आणि इतर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. दरम्यान, 76 वर्षीय हसीना या 2009 पासून सत्तेत आहेत. यातच पुन्हा एकदा निवडणूक जिंकून त्यांनी सत्ता राखली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, मतमोजणी सुरू असून शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीगने 50 टक्क्यांहून अधिक जागा काबीज केल्या आहेत. अवामी लीगने लढवलेल्या जागांवर कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला टिकत आलं नाही. (Latest Marathi News)

गोपालगंज-3 मधून शेख हसीना विजयी

गोपालगंज-3 लोकसभा मतदारसंघातून शेख हसीना यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. त्यांना 2,49,965 मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला फक्त 469 मते मिळाली.

मतदान सुरू होताच शेख हसीना यांनी भारताबाबत मोठे वक्तव्य केले होते. भारत हा बांगलादेशचा विश्वासू मित्र असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. आम्ही खूप भाग्यवान आहोत की भारत आमचा मित्र आहे. आमच्या स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी आम्हाला साथ दिली, असे त्या म्हणाल्या होत्या. 1975 नंतर जेव्हा आम्ही आमचे संपूर्ण कुटुंब गमावले तेव्हा त्यांनी आम्हाला आश्रय दिला. त्यामुळे भारतातील जनतेला आमच्या शुभेच्छा, असंही हसीना म्हणाल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT