शालेय जीवनातच विद्यार्थांना रस्ता वाहतुकीचे नियम शिकवणे हे गरजेचे असून 18 वर्षाखालील मुलांना रस्ता सुरक्षतेसाठी जागरूक करण्यासाठी समाज माध्यमे , महाविद्यालय, सामाजिक संघटना यांनी पुढाकर घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे 'सडक सुरक्षा अभियान 2024 - संवेदना का सफर ' या वनामती सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना दिलेल्या मुलाखती मध्ये केले.
देशात वर्षाभरात 5 लाख अपघात होत असून यामध्ये 18 ते 34 वयोगटातील तरुण वर्गाचा समावेश आहे. या अपघातामुळे देशातील जीडीपीचे 3 टक्के नुकसान होत असून यातून होणारे आर्थिक-सामाजिक नुकसान अत्यंत गंभीर आहे. देशातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते वाहतूक आणि सुरक्षा अधिक बळकट करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे गडकरी यांनी सांगितले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, रस्ते वाहतूक सुरक्षता लक्षात घेवून आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मानांकन पाळून देशात नवीन बस कोड तयार झालेला आहे. याचाच एक भाग म्हणून यापुढे प्रत्येक वाहनांमध्ये 6 एअर बॅग्स अनिवार्य केलेले. रोड इंजिनिअरिंगच्या माध्यमातून देशातील रस्त्यावर 3 ,600 ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण स्थळ) आढळले असून त्यांची योग्य ती काळजी घेऊन ती स्थळे वाहतूक योग्य बनवण्यात आली आहेत.नवीन मोटर अधिनियम कायद्यातील सर्व तरतुदीचे पालन करणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)
तसेच इथून पुढे वाहतूक परवाना प्रदान करताना वाहतूक संबंधीची ऑनलाइन परीक्षा देणे गरजेचे आहे.वाहतुकीचे सर्व नियम कायदे या परीक्षेत अंतर्भूत होतील याबद्दल तयारी सुरू आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील रस्त्यांसाठी व्हाईट टॉपिंग काँक्रिटीकरण करून रस्त्याची मजबुती अजून वाढवण्यात येणार आहे जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल आणि दळणवळणाला चालना मिळेल यासाठी 6 हजार कोटींचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, राज्य शासन पोलीस विभाग आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय यांच्या समन्वयातून वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत तसेच याबद्दलची नवीन मार्गदर्शिका लवकरच उपलब्ध होईल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.