FORMER BANGLADESH PM SHEIKH HASINA SENTENCED TO PRISON saam tv
देश विदेश

Sheikh Hasina: मोठी बातमी! शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, १४०० जणांच्या हत्याप्रकरणात दोषी

FORMER BANGLADESH PM SHEIKH HASINA: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शेख हसीना यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. १४०० जणांच्या हत्याप्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले.

Priya More

Summary:

  • बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा

  • कोर्टाने १४०० जणांच्या हत्याप्रकरणात दोषी

  • तर बांगलादेशच्या माजी गृहमंत्र्यांना देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आली

  • तर पोलिस महासंचालक यांना ५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सोमवारी शेख हसीना यांच्याविरोधात निकाल देत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईत शेख हसीना यांच्या भूमिकेसाठी त्यांच्याविरोधात खटला सुरू होता. यामध्ये कोर्टाने शेख हसीना यांना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने शेख हसीना यांना १४०० जणांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवत त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने सुनावणीदरम्यान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. यामध्ये नागरिकांवर गोळीबार करणे याचा समावेश आहे. शेख हसीना यांनी आंदोलन दडपण्यासाठी आणि आंदोलकांना मारण्यासाठी प्राणघातक शस्त्रे आणि ड्रोन वापरण्याचे आदेश दिले होते. आंदोलकांवर हल्ले शेख हसीना आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आदेशावरून करण्यात आले होते. शेख हसीना यांना ३ कारणांवरून दोषी ठरवण्यात आले. नागरिकांना भडकवणे, हत्येचे आदेश देणे आणि गुन्हेगारांवर कारवाई करण्यात अयशस्वी होणे या ३ कारणांवरून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

पहिल्या आरोपामध्ये शेख हसीना परिस्थिती हाताळण्याची आणि हिंसाचार रोखण्याची जबाबदारी पाडण्यात अयशस्वी ठरल्या. या प्रकरणात पोलिस महानिरीक्षक हे देखील दोषी असू शकतात हे देखील पुराव्यांवरून दिसून आले. न्यायालयाने अहवाल दिला की, १९ जुलैनंतर गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी अनेक बैठका झाल्या. ज्यामध्ये विद्यार्थी आंदोलन दडपण्याचे निर्देश देण्यात आले. शेख हसीना यांनी आंदोलनकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी कोअर कमिटीला आदेश दिले होते.

याप्रकरणात न्यायालयाने एकूण ५४ साक्षीदारांचे म्हणणे ऐकले. देशभरातून गोळा केलेले पुरावे आणि विविध स्रोतांकडून मिळालेले अतिरिक्त पुरावे देखील तपासण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांच्या एका एजन्सीच्या अहवालाचा अभ्यास करण्यात आला आणि त्यात असा निष्कर्ष काढण्यात आला की शेख हसनी आणि गृहमंत्र्यांच्या आदेशावरूनच मानवतेविरुद्ध गुन्हे करण्यात आले होते. त्यामुळे कोर्टाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली. बांगलादेशच्या माजी गृहमंत्र्यांना देखील फाशीची शिक्षा सुनावली. तर पोलिस महासंचालकांना ५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. सध्या शेख हसीना आणि माजी गृहमंत्री हे भारतामध्ये आहेत. तर पोलिस महासंचालक तुरूंगात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pineapple Cuting Tips : घरच्या घरी अननस कसा कापायचा?

Shocking News : धक्कादायक! रिक्षाचालकाचं भयंकर कृत्य, नववीतील विद्यार्थ्यावर नेलकटरनं हल्ला

Palghar Tourism : वीकेंडला फिरायला परफेक्ट डेस्टिनेशन, डहाणू ट्रेन पकडा अन् थेट पोहचा 'या' लोकेशनला

Navi Mumbai: ख्रिसमसपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा; जाणून घ्या उड्डाणांचे वेळापत्रक अन् संपूर्ण ऑपरेशन

Maharashtra Live News Update: गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे शक्ती प्रदर्शन करीत काँग्रेसने भरला नगराध्यक्ष पदाचा अर्ज

SCROLL FOR NEXT