Sharad Pawar Saam TV
देश विदेश

National Political News: महाराष्ट्रात भूकंप, दिल्लीत हादरे; राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजधानीतही पडले दोन गट

NCP News: प्रफुल्ल पटेल यांचा फोटो काढल्यानंतर पटेल गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

साम टिव्ही ब्युरो

प्रमोद जगताप

New Delhi News : महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीचे पडसाद दिल्लीतही उमटू लागले आहेत. दिल्ली राष्ट्रवादीत फूट पडल्याचं चिन्ह आहे. दिल्लीत राष्ट्रवादी कार्यालयात दोन गट पडले आहेत. प्रफुल्ल पटेल यांचा फोटो काढल्यानंतर पटेल गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दिल्लीतील कार्यालयावर प्रफुल्ल पटेल यांच्या गटाने दावा केला आहे. एकंदर परिस्थिती पाहता पोलिसांचा फौजफाटा राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाला आहे. कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस आले होते. राष्ट्रवादीचे दिल्ली अध्यक्ष योगानंद शास्त्री याबाबतची माहिती दिली आहे.  (Latest Marathi News)

दुपारी प्रफुल पटेल यांचा फोटो काढल्यापासून इथं पोलीस आले आहेत. इथे काय सुरु आहे मला किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना काही सांगितलं जात नाही. काही न सांगता पोलिसांकडून हे कृत्य केलं जातं आहे. पोलिसांनी हात पकडून माझ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. तुम्ही इथून कुठले कागदपत्र घेऊन जाऊ शकत नाही, असं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. मी आज रात्रभर इथं बसून राहणार, असेल हिंमत तर हटवून दाखवा. माझं शरद पवार यांच्यासोबत बोलणं झालं आहे, असं सोनिया दुहान यांनी सांगितलं.

ठाण्यात अजित पवार समर्थक आक्रमक

ठाण्यात अजित पवार गटातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्या फोटोला फुल्या आणि जोडे मारत निषेध केला. (Political News)

काल ज्या पद्धतीने अजित दादांच्या प्रतिमेला काळे फासले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी युवकचे वीरेंद्र वाघमारे आणि मोसिन शेख यांच्याकडून निषेध नोंदवण्यात आला. या बॅनरवर आव्हाड यांना बंटी तर जयंत पाटील यांचा बबली असा उल्लेख करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी गडचिरोलीत हजारो आदिवासींचा एल्गार

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

AC temperature: कोणत्या तापमानावर एसी चालवल्याने विजेचे बिल कमी होतं?

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

SCROLL FOR NEXT