AC temperature: कोणत्या तापमानावर एसी चालवल्याने विजेचे बिल कमी होतं?

Surabhi Jayashree Jagdish

एसी

उन्हाळ्यात एसीची गरज वाढते पण त्याच्या वापरामुळे विजेचं बिलही वाढू शकतं. अनेक जण खोली लवकर थंड व्हावी म्हणून एसीचे तापमान १६ किंवा १८ डिग्री सेल्सिअसवर ठेवतात. मात्र, कमी तापमान ठेवल्याने एसीचा वीजवापर वाढू शकतो.

Best AC temperature in summer | saam tv

कमी तापमान

एसीमध्ये कंप्रेसर हा महत्त्वाचा भाग असतो. खोलीचं तापमान सेट केलेल्या कमी तापमानापर्यंत आणण्यासाठी कंप्रेसरला जास्त वेळ काम करावं लागू शकतं. त्यामुळे एसीचा वीजवापर वाढू शकतो आणि विजेचे बिलही जास्त येऊ शकतं.

Reduce AC electricity bill | saam tv

बिल कसं वाढतं?

एसी जितकी जास्त वीज वापरतो तितका विजेचा खर्च वाढण्याची शक्यता असते. एसीचा वापर रोज अनेक तास केल्यास महिन्याच्या एकूण वीजवापरात मोठी भर पडू शकते. त्यामुळे एसीचं तापमान योग्य ठेवणे हा विजेचे बिल कमी करण्याचा एक सोपा मार्ग आहे.

Ideal AC temperature | saam tv

२४ डिग्री

एसीचं तापमान १६ किंवा १८ डिग्रीऐवजी २४ डिग्री सेल्सिअसवर ठेवल्यास वीज वाचवण्यास मदत होऊ शकते. या तापमानावरही खोली थंड ठेवता येतं आणि एसीला अतिशय कमी तापमान गाठण्याची गरज राहत नाही.

AC temperature for power saving | saam tv

तापमान वाढवल्याने किती वीज वाचते?

ऊर्जा दक्षता पोर्टलनुसार, एसीचं तापमान प्रत्येक एक डिग्रीने वाढवल्यास सुमारे ६ टक्के वीज वाचू शकते. त्यामुळे एसीचं तापमान कमी ठेवण्याऐवजी थोडं वाढवल्यास वीजवापर कमी करण्यास मदत मिळू शकते.

AC at 24 degrees Celsius | saam tv

किती बचत होते?

एसीचे तापमान १६ डिग्रीवरून २४ डिग्रीवर नेल्यास तापमानात आठ डिग्रींचा फरक पडतो. प्रत्येक डिग्रीला सहा टक्के बचत हा अंदाज सरळ गुणाकाराने लावल्यास ४८ टक्के बचत होऊ शकते असं गणित मांडलं जातं.

AC usage tips | saam tv

वर्षभरात किती पैशांची बचत होऊ शकते?

एसीचे तापमान २४ डिग्रीवर ठेवण्याची सवय लावल्यास दर महिन्याच्या विजेच्या बिलात बचत होऊ शकते. एसीचा वापर जास्त असलेल्या घरांमध्ये या छोट्या बदलाचा वर्षभरात चांगला फायदा होऊ शकतो.

Home cooling solutions | saam tv

Tyre expiry date: वाहनांच्या टायरची एक्सपायरी डेट काय असते? जाणून घ्या

Tyre expiry date | saam tv
येथे क्लिक करा