Carpet Cleaning : घाणेरडे कार्पेट स्वच्छ करण्यासाठी एकही रुपया खर्च नको! घरच्या घरी ड्राय क्लीनिंग करण्याच्या 3 सोप्या स्टेप्स

Shreya Maskar

दिवाळी

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीच्या साफसफाईला आताच सुरुवात करा. फरशीवरील कार्पेटवर सर्वात जास्त घाण जमा होते. सततच्या पावलांमुळे धूळ आणि घाण साचते, ज्यामुळे ते स्वच्छ करणे कठीण होते.

Diwali | pinterest

ड्राय क्लीनिंग

बाजारात ड्राय क्लीनिंगसाठी ५००-१००० पासून सुरुवात होते. एवढे पैसे घालवण्यापेक्षा तुम्ही घरात सिंपल पद्धतीने कार्पेट स्वच्छ करू शकता. कसे, जाणून घेऊयात.

Dry cleaning | pinterest

कार्पेट ड्राय क्लीनिंग

कार्पेटमध्ये साचलेली धूळ आणि घाण आधी झाडूने काढून टाका. धूळ आणि घाण काढण्यासाठी झाडूचा वापर करा.

Carpet Dry Cleaning | pinterest

बेकिंग सोड

नंतर कार्पेट फरशीवर पसरा आणि त्यावर बेकिंग सोडा शिंपडा. एका बादलीत दोन लिटर पाणी घ्या आणि त्यात मीठ घाला. शॅम्पूचे एक सॅशे टाका आणि ते मिसळा.

Baking Soda | pinterest

टॉवेल

एक जुना फायबर-कोटेड टॉवेल घ्या आणि तो तयार केलेल्या पाण्याच्या मिश्रणात बुडवा. नंतर तो पूर्णपणे पिळून घ्या, कोरडा करा आणि कार्पेटवर चोळा.

Towel | pinterest

पाणी

प्रथम, स्वच्छ पाण्याने कापड कार्पेटच्या लहान भागांवर हळुवारपणे चोळून स्वच्छ करा. नंतर ते पुन्हा तयार केलेल्या मिश्रणात बुडवा, भिजवा आणि पुन्हा चोळा.

Water | pinterest

कार्पेट सुकवा

अशा प्रकारे लहान भागांवर चोळल्याने संपूर्ण कार्पेट स्वच्छ होईल. आता, कार्पेटला पंख्याच्या हवेखाली सुकू द्या. १ रुपयाही खर्च न करता खोलीतील कार्पेट चमकू लागेल.

Dry the carpet | pinterest

टीप

जर कार्पेट खूप घाण झाले असेल आणि त्याला दुर्गंध येत असेल, तर त्यावर बेकिंग सोडा आणि मीठ शिंपडा आणि एक तास किंवा रात्रभर तसेच ठेवा.

Tip | pinterest

NEXT : गाढ झोप झाली तरी सकाळी उठल्यावर डोकं का भणभणतंय? 'या' ५ गंभीर चुका ठरू शकतात कारणीभूत

Sleep Mistakes | AI PHOTO
येथे क्लिक करा...