Crime Saam Tv
देश विदेश

कॉलेजच्या बाथरूममध्ये 'B.SC' च्या विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, सुरक्षा रक्षकही चौकशीच्या घेऱ्यात

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

उत्तर प्रदेश : महाराजगंज शहरातील युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये बीएससीच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थिनीवर (B.SC Student) बाथरूममध्ये बलात्कार करण्याचा (Sexual assault) प्रयत्न करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यांनी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी (Medical test) केली आहे. आरोपीने घटनास्थळाहून पळ काढला आहे. या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाहीत. अशा परिस्थितीत पोलीस (police) पुरावे गोळा करत आहेत. आरोपींच्या सीडीआर तपशिलासोबतच मोबाईल नेटवर्क टॉवरचे मॅपिंगही केले जात आहे. ज्याद्वारे हे कळेल की घटनेच्या वेळी आरोपीचे ठिकाण कोणतं होतं.

पीडितेला आरोपींची ओळख पटवता येत नव्हती

या घटनेबाबत पीडितेने सांगितले की, प्रत्येकाने मास्क घातल्यामुळे ती कोणालाही ओळखू शकली नाही. मात्र एका आरोपीच्या हाताला तिने दाताने चावा घेतला आहे. मुलीच्या भावाने फिर्याद दिली असून गावातील तरुण आणि त्याच्या चुलत भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञातासह दोन आरोपींविरुद्ध बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. रविवारी कॉलेजमध्ये पोहोचलेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली. मात्र, या घटनेशी संबंधित कोणतेही पुरावे पोलिसांना अद्याप मिळालेले नाहीत.

सर्व बाजू तपासत आहे

दुसरीकडे, युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक कौस्तुभ कुमार यांनी सांगितले की, पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सर्व मुद्दे तपासले जात आहेत. एकही निर्दोष तुरुंगात जाणार नाही. त्यापैकी एक आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबीयांमध्ये जमिनीचा वाद आहे. याबाबत अनेकदा गावात पंचायतही झाली. या मुद्यांवरही पोलीस तपास करत आहेत. त्याचवेळी या प्रकरणात आरोपीच्या वडिलांनी आपला मुलगा आणि भाच्याविरोधात बलात्काराचा प्रयत्न केल्याचा खोटा आरोप करून त्यांना गोवण्यात येत असल्याचे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोकुळ दूधसंघाच्या प्रकरणात सतेज पाटील यांना न्यायालयाकडून न्यायची अपेक्षा

EPFO Update : मोठी बातमी! EPF खात्यातील चुकीचं नाव किंवा जन्मतारीख घरबसल्या बदला; फक्त ५ सोप्या स्टेप्स

Palak Paneer Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी चविष्ट पालक पनीर, वाचा सोपी रेसिपी

मुंबई पळून जाताना आमदाराला अटक, खंडणीच्या गुन्ह्यात मोठी कारवाई, राजकीय वर्तुळात खळबळ

Suraj Chavan: 'माझी लाडाची लक्ष्मी...'; सूरज चव्हाणने पहिल्यांदाच दाखवला लेक राधाचा चेहरा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT