सेक्स रॅकेट: भोपाळ मध्ये विदेशी काॅल गर्ल ची मागणी वाढली Saam TV
देश विदेश

सेक्स रॅकेट: भोपाळ मध्ये विदेशी काॅल गर्ल ची मागणी वाढली

दर महिन्याला येथे 50 हून अधिक मुलींची तस्करी होत आहे.

वृत्तसंस्था

भोपाळ: इंदोर नंतर भोपाळमधून एक मोठी घटना समोर आली आहे. भोपाळ मध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याचं समोर आलं आहे. राजधानी भोपाळमध्ये परदेशी मुलींना खूप मागणी आहे आणि दर महिन्याला येथे 50 हून अधिक मुलींची तस्करी होत आहे. हे सेक्स रॅकेट एमपी सह पुणे आणि बंगळुरूमध्ये पसरले आहे. इंदूरमध्ये पकडलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचे भोपाळ कनेक्शन समोर आले आहे. इंदूर एसआयटीने पकडलेल्या बांगलादेशी मुलींचा तस्कर मुनीर उर्फ मुनीरुलच्या चौकशीत या संबंधाची माहिती प्राप्त झाली आहे. आता इंटेलिजन्स या प्रकरणाचा इंदोर एसआयटीसह तपास करत आहे.

विकेडला विदेशी मुलींची जास्त मागणी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भोपाळमध्ये पर्यटक व्हिसावर दर महिन्याला सुमारे 55 मुली परदेशातून आणल्या जात आहेत. शुक्रवार, शनिवारी म्हणजेच वीकेंडला जास्तीत जास्त मागणी असते, त्यामुळे जास्तीत जास्त परदेशी मुली भोपाळला आणल्या जातात. भोपाळबरोबरच त्यांना वेश्या व्यवसायासाठी इतर जिल्ह्यांच्या मोठ्या हॉटेल्समध्ये राहण्यासाठी पाठवले जाते. टुरिस्ट व्हिसाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय फोफावत आहे. सूत्रांनी सांगितले की, आता इंदूर पोलिसांसह गुप्तचर परदेशातून येणाऱ्या मुलींवर लक्ष ठेवून आहेत.

सीमा ओलांडून भारतात तस्करी

गेल्या वर्षी इंदोर पोलिसांनी हॉटेलमधून वेश्या व्यवसायात अडकवलेल्या काही मुलींना पकडले. या प्रकरणात आरोपी मुनीर फरार होता. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, पुणे, मुंबई, बेंगळुरू येथेही मुलींना पुरवण्याचे मोठे नेटवर्क आरोपीचे आहे. आरोपी मुनीरने बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून मुलींना भारतात आणले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार

Bharti Singh Divorce : भारती सिंगचा ९ वर्षानंतर संसार मोडणार? कॉमेडी क्वीनने नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Panvel : भव्य सुळ्यासारखा अन् सुईच्या टोकासारखा दिसतो पनवेलजवळील किल्ला, 'येथे' जाण्याआधी ट्रेकर्स १०० वेळा करतात विचार

Labour Code Rules: ४ दिवस काम अन् ३ दिवस सुट्ट्या; नवीन कामगार कायद्यात कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

IPL 2026 : लाईव्ह टीव्हीवर ऋषभ पंतची जीभ घसरली, अश्लील शब्द वापरला, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT