Shreya Maskar
इर्शाळगड किल्ला हा महाराष्ट्रात माथेरान आणि पनवेल दरम्यान सह्याद्रीमध्ये वसलेला एक ऐतिहासिक ठिकाण आहे. हे एक टेहळणी बुरूज आहे. तसेच थरारक ट्रेकिंग स्पॉट आहे.
सुमारे ३,७०० फूट उंचीवर असलेला इर्शाळगड किल्ला त्याच्या आकर्षक शिखरासाठी प्रसिद्ध आहे आणि तो प्रबळगडाचा भगिनी किल्ला मानला जातो.
इर्शाळगड भव्य सुळ्यासारखा आणि सुईच्या टोकासारखा दिसतो. किल्ल्यावरून सभोवतालच्या सह्याद्री पर्वतरांगांच्या विहंगम दृश्य दिसते.
मोरबे धरण हे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या परिसरामध्ये वसलेले आहे.
इर्शाळगड किल्ल्याजवळ आणखी ऐतिहासिक किल्ले आहेत. यात प्रबळगड , कलावंतीण दुर्ग, कर्नाळा किल्ला, चंदेरी किल्ला, मलंगगड आणि माणिकगड यांचा समावेश आहे.
इर्शाळगडच्या सर्वात जवळचे आणि प्रमुख हिल स्टेशन माथेरान आहे. हे ठिकाण इर्शाळगड ट्रेकच्या पर्वतरांगांमध्येच मोडते आणि गडावरून माथेरानचे विहंगम दृश्य दिसते. माथेरानला गेल्यावर किल्ला पाहायला नक्की जा.
पनवेलजवळ खूप सुंदर पिकनिक स्पॉट आहेत. यात कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि किल्ला, गाढेश्वर धरण , अदाई धबधबा यांचा समावेश आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.