Pune Tourism : पुण्यात लपलंय महाराष्ट्रातील 'मिनी युरोप', सह्याद्रीतील 'ही' रंगीबेरंगी स्वप्ननगरी पाहायला परदेशी पर्यटकांचीही होते मोठी गर्दी

Shreya Maskar

पुणे

पुण्यातीस 'लवासा' हे ठिकाण महाराष्ट्रातील 'मिनी युरोप' म्हणून ओळखले जाते. लवासा हे खाजगी थंड हवेचे ठिकाण (हिल स्टेशन) आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांग मुळशी खोऱ्यात लवासा आहे..

Pune | google

लवासा

पुण्याहून लवासाला पोहोचण्यासाठी साधारणपणे १.५ ते २ तास लागतात. मुंबई, पुण्याच्या लोकांना वीकेंडला फिरायला ही एक सुंदर लोकेशन आहे.

Lavasa | yandex

युरोपियन शैली

लवासाला गेल्यावर युरोपियन शैली पाहायला मिळते. लवासा शहराची संपूर्ण रचना इटलीमधील 'पोर्टोफिनो' (Portofino) या सुंदर शहरावरून प्रेरित आहे.

European Style | yandex

इतर नावे

लवासा या खाजगी हिल स्टेशनला 'भारताचे इटली' किंवा 'मिनी इटली' असे टोपणनाव आहे. लवासा येथील वास्तुकला पाहून तुम्ही भारावून जाल.

Other Names | yandex

दासवे तलाव

लवासा येथे दासवे तलाव आहे. येथे पर्यटकांसाठी जेट स्कीइंग, कयाकिंग, पेडल बोटी आणि स्पीड बोट अशा अनेक वॉटर स्पोर्ट्स सुविधा उपलब्ध आहेत.

Dasve Lake | yandex

इमारती

लवासा येथील इमारती भडक रंगांनी (जसे की लाल, पिवळा, निळा), टोकदार छपरांनी आणि लाकूड-दगडाच्या फिनिशिंगने बांधलेल्या आहेत.

Buildings | yandex

फोटोशूट

लवासा येथे तुम्ही प्री-वेडिंग शूट करू शकता. निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला येथे जोडीदारासोबत निवांत वेळ घालवता येतो.

Photoshoots | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Lavasa | yandex

NEXT : माथेरान-बदलापूर पर्वतरांगेत वसलाय किल्ला, खूप कमी लोकांना माहितेय 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Fort Near Badlapur | saam tv
येथे क्लिक करा...