Shreya Maskar
चंदेरी किल्ला हा महाराष्ट्रातील माथेरान-बदलापूर पर्वतरांगेत वसलेला एक आव्हानात्मक आणि ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ७९० मीटर (२,३०० फूट) उंचीवर स्थित आहे.
चंदेरी किल्ला हा एक कठीण ट्रेकिंग स्पॉट आहे. प्राचीन गुंफा आणि खडकात कोरलेल्या पायऱ्या येथे पाहायला मिळतात. हा किल्ल्यावरून सह्याद्री पर्वतरांगेचे विहंगम दृश्य दिसते.
चंदेरी किल्ला हे बदलापूर आणि कर्जत यांच्या दरम्यान, दख्खनच्या पठारावर स्थित असलेले २,३४३ फूट उंचीचे एक रोमांचक शिखर आहे. येथून निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळतो.
चंदेरी किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर तटबंदी किंवा बांधकामे नसल्यामुळे प्राचीन काळी हे ठिकाण एक टेहळणी बुरूज म्हणून वापरले जात असावे, असे मानले जाते.
१६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण-भिवंडीचा परिसर जिंकून घेतला, तेव्हा चंदेरी गड स्वराज्यात सामील झाल्याचे मानले जाते.
चंदेरी किल्ल्यावर भगवान शंकराची मूर्ती असलेली एक मोठी गुंफा आहे. येथे तुम्हाला शांत वातावरण अनुभवता येते.
बदलापूर येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. यात कोंडेश्वर मंदिर आणि धबधबा, बार्वी धरण, भोज धरण या पर्यटन स्थळांचा समावेश आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.