Shreya Maskar
आंबा घाट हा महाराष्ट्रातील कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला एक नयनरम्य घाट आहे. आंबा घाट हे महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशन म्हणूनही ओळखले जाते.
आंबा घाट समुद्रसपाटीपासून सुमारे २,००० ते ३,१०० फूट उंचीवर वसलेले आहे. दाट जंगले, दऱ्या आणि धबधब्यांनी आंबा घाट वेढलेला आहे, ज्यामुळे हे एक आल्हाददायक 'हिल स्टेशन' आहे. पावसाळ्यात धुक्याची चादर पाहायला मिळते.
आंबा घाट हे दख्खनचे पठार (पश्चिम महाराष्ट्र) आणि कोकण या दोन भौगोलिक आणि सांस्कृतिक प्रदेशांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दुवा आणि प्रवेशद्वार आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत दख्खनचे पठार आणि कोकणचा किनारा यांच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण लष्करी आणि व्यापारी दुवा म्हणून या घाटाने भूमिका बजावली होती.
आंबा घाटजवळ दाजीपूर राधानगरी अभयारण्य आहे. हे पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवन आहे. येथे तुम्ही 'शेकरू', आणि 'गवा' यांसारखे प्राणी पाहू शकता.
आंबा घाटजवळ विशालगड किल्ला, पवनखिंड, मानोली धरण आणि धबधबा, गगनबावडा, कोकण कडा अशी सुंदर निसर्गरम्य ठिकाणे आहेत. आंबा घाटात पॅराग्लायडिंगचा रोमांचक अनुभव घेता येतो.
संगमेश्वर हे आंबा घाटजवळील रेल्वे स्टेशन आहे. स्टेशनला उतरून बस, रिक्षा आणि खाजगी टॅक्सीने तुम्ही सहज आंबा घाट या सुंदर ठिकाणी पोहचाल.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.