India-France PMO Twitter
देश विदेश

India-France: भारत-फ्रान्समध्ये अनेक करार; दोन्ही देशात झाली टाटा एयरबससह हेलीकॉप्टरची डील

India-France: भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशात संरक्षण औद्योगिक भागीदारी 'रोडमॅप'वर सहमती झालीय. या सहमतीमुळे प्रमुख लष्करी हार्डवेअर आणि प्लॅटफॉर्मचा विकास आणि सह-उत्पादनाचा मार्ग मोकळा होईल. अंतराळ, जमिनीवरील युद्ध, सायबर जग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासह अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांकडून तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देतील.

Bharat Jadhav

India-France Talks:

काल रात्री जयपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात चर्चा झाली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी दिली. टाटा आणि एअरबस हेलिकॉप्टरसह महत्त्वाच्या स्वदेशी उपकरणांसह H125 हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी दोन्ही देशांकडून भागीदारीवर स्वाक्षरी करण्यात आल्याचं क्वात्रा यांनी सांगितले.(Latest News)

शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी सांगितले की, भारत-फ्रान्स हे दोन्ही देशांकडून संरक्षण उद्योग रोडमॅप रोबोटिक्स, स्वयंचलित वाहने आणि सायबर संरक्षण क्षेत्रातही सहकार्य वाढण्यात येईल. न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि फ्रान्सच्या एरियनस्पेस यांच्यात उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठीही सामंजस्य करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

क्वात्रा म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन यांनी गाझामधील संघर्ष, दहशतवाद आणि मानवतावादी पैलूंसह त्याचे विविध बाबींवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी निर्माण होत असलेली सुरक्षा परिस्थिती, संभाव्य व्यत्यय आणि लाल समुद्रातील वास्तविक घडामोडींवरही चर्चा केली. दरम्यान मॅक्रॉन यांनी गुरुवारी जयपूरला भेट देऊन दोन दिवसीय भारत दौऱ्याची सुरुवात केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT