Madagaskar News: आफ्रिकन देश मादागास्करमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. मादागास्करमध्ये आयोजित ओशन आयलँड गेम्सच्या उद्घाटन समारंभात चेंगरा चेंगरीची घटन घडली. यामध्ये तब्बल १२ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर राष्ट्राध्यक्षांनी शोक व्यक्त केला आहे.
याबाबत स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, मादागास्करमधील बारिया स्टेडियमवर शुक्रवारी इंडियन ओशन आयलँड गेम्सचा (IOIG) उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी जवळपास ५० हजार प्रेक्षक आले होते. कार्यक्रमावेळी स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला. तर ८० जण गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्देवी घटनेनंतर मादागास्करचे पंतप्रधान ख्रिश्चन एनत्से रुग्णालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी चेंगराचेंगरीत सुमारे ८० लोक जखमी झाले असून त्यापैकी ११ जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती दिली, तसेच नागरिकांना शांततेचे आवाहनही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, या चेंगराचेंगरीचे मुख्य कारण अद्याप समोर आले नाही. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. ३ सप्टेंबरपर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार असून मॉरिशस, सेशेल्स, कोमोरोस, मादागास्कर, मेयोट, रीयुनियन आणि मालदीवमधील खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला आहे. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.