कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; एका तासात 5 दहशतवादी ठार! Saam Tv
देश विदेश

कुलगाममध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; एका तासात 5 दहशतवादी ठार!

TRF कमांडर सिकंदर ठार

वृत्तसंस्था

कुलगाम: दक्षिण काश्मीरमधील Kashmir कुलगाममध्ये बुधवारी (ता. १७) संध्याकाळी सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा 5 terrorist killed खात्मा केला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये लश्करशी संलग्न द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) चा कमांडर असफाक अहमद असल्याची माहिती आहे. इतर दहशतवाद्यांची संदर्भात माहिती मिळवण्याचे कार्य सुरु आहे.

हे देखील पहा-

काश्मीरचे आयजी विजय कुमार (IG Vijay Kumar) म्हणाले की, बुधवारी सुरक्षा दलांना कुलगाम जिल्ह्यातील पोमबाई आणि गोपालपोरा गावात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि दोन्ही ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी ठार झाले.

यामध्ये एका दहशतवाद्याची ओळख टीआरएफ कमांडर असफाक अहमद अशी झाली आहे. इतरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी सोमवारी श्रीनगरच्या हैदरपोरामध्ये पाकिस्तानी दहशतवादी बिलाल उर्फ ​​हैदर आणि त्याच्या स्थानिक साथीदाराला सुरक्षा दलांनी ठार केले आहे.

लोकांना चकमकीच्या ठिकाणापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे,
सामान्य लोकांना घटनास्थळाजवळ न जाण्यास सांगण्यात आले आहे. तेथे स्फोटके पडून असू शकतात.

नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत दहा दहशतवादी मारले गेले
11 नोव्हेंबरला कुलगाममध्ये टीआरएफचे दोन दहशतवादी मारले गेले. गजवतुल हिंदचा मुजाहिद्दीन कमांडर बेमिना, श्रीनगरमध्ये ठार झाला. 15 नोव्हेंबर रोजी श्रीनगरच्या हैदरपोरा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. 17 नोव्हेंबरला कुलगाममध्ये TRF कमांडरसह पाच दहशतवादी ठार मारले गेले आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना भाऊबीज कधी मिळणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्वाची अपडेट

Morning symptom of cancer: सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिलं दिसतं कॅन्सरचं हे लक्षण; 99% लोकं करतात इग्नोर

Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला बायकोने नवऱ्याला का ओवाळावे? जाणून घ्या जुनं शास्त्र

Diwali Photo Tips: दिवाळीत फोटो कसे क्लिक करावे? प्रोफेशनल लुकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स

Thamma OTT Release : रश्मिकाचा 'थामा' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT