Terrorists Caught in jammu and kashmir Saam TV
देश विदेश

Terrorists Caught: प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट उधळला; तीन सशस्त्र दहशतवादी पकडले, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

Jammu-Kashmir News: २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. सुरक्षा दलांच्या जवानांनी तीन संशयित दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक केली आहे.

Satish Daud

Terrorists Caught in jammu and kashmir

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्याचा कट सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला, बोनियार परिसरात सुरक्षा दलांच्या जवानांनी तीन संशयित दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २ पिस्तूल, २ ग्रेनेड, २ मॅगझिनसह २४ गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. संशयित दहशतवाद्यांकडून या शस्त्रांचा तांदळाच्या पाकिटात लपवून पुरवठा करीत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडन सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफीने संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनी काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचे आणि दहशत पसरवण्याचे दोन कट सतर्क सुरक्षा दलांनी उधळून लावले आहेत. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा येथे रस्त्याच्या कडेला दहशतवाद्यांनी स्फोटक यंत्र (IED) बसवलं होतं.

हा प्रकार एका स्थानिकाच्या लक्षात आला. त्याने तातडीने या घटनेची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना दिली. माहिती मिळताच पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला. आयईडी असल्याची खात्री झाल्यानंतर बॉम्ब निकामी पथकाने संशयित स्फोटक नष्ट केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

दुसरीकडे काश्मीरच्या बारामुल्ला, बोनियार परिसरातून काही संशयित लोक तांदळाच्या पोत्यांमधून शस्त्राचा पुरवठा करीत होते. या घटनेची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या शस्त्राचा ते नेमका कुणाला पुरवठा करीत होते. याचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT