उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होणार; पंतप्रधानांकडून होणार उद्घाटन Saam Tv
देश विदेश

उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होणार; पंतप्रधानांकडून होणार उद्घाटन

१० ऑगिस्ट रोज या उपक्रमाचे उद्घाटन होणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - दारिद्य्ररेषेखालील कुटुंब आणि गोर गरीबांसाठी सुरु करण्यात आलेल्या उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच प्रारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या हस्ते १० ऑगिस्ट रोज या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पाडणार आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २.० अंतर्गत, लाभार्थ्यांना केवळ एलपीजी कनेक्शन LPG Connection मोफत मिळणार नाही, तर गॅस स्टोव्ह Gas Stove आणि कमीतकमी कागदपत्रासह भरलेले सिलेंडर Cylinder देखील मिळतील. सरकारने म्हटले आहे की, या योजनेअंतर्गत स्थलांतरितांना रेशन कार्ड किंवा कोणताही पत्ता प्रमाणपत्र देण्याची गरज नाही.

हे देखील पहा -

उत्तर प्रदेश Uttar Pradesh मधील महोबा येथील गरीब कुटुंबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोफत गॅस कनेक्शन वितरीत करण्यात येणार आहे. या आधी २०१६ साली पहिल्यांदा उज्ज्वला योजना सुरु करण्यात आली होती. दारिदय्ररेषेखाली असणाऱ्या ५ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या योजनेचा विस्तार एप्रिल २०१८ मध्ये करण्यात आला. ७ श्रेणीतील महिलांचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्यावेळी निर्धारित लक्ष्य ८ कोटीपर्यंत वाढवण्यात आले.

असे करा ऑनलाईन अर्ज

सर्व पथम तुम्हाला आधी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर pmujjwalayojana.com या संकेतस्थळावर वर क्लिक करा. होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर या पर्यायावर जा आणि त्यावर क्लिक करा. डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यावर तुम्हाला पीएम उज्ज्वला योजनेचा फॉर्म दिसेल त्या फॉर्ममध्ये तुमची संपूर्ण माहिती भरा. त्यावर एक ओटीपी जनरेट करा आणि फॉर्म डाऊनलोड करा. त्यानंतर तुमचा फॉर्म जवळच्या कुठल्याही एलपीजी गॅस एजन्सीमध्ये सबमिट करा.

फॉर्म जवळच्या एलपीजी एजन्सीकडे जमा करा. फॉर्मसह आपल्याला स्थानिक पत्त्याचा पुरावा, बीपीएल रेशन कार्ड, आधार कार्ड आणि फोटो यासह इत्यादी कागदपत्रे द्यावी लागतील. कागदपत्र तपासल्यावर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येणार.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरेंच्या सभेमध्ये EVM चोरीचा डेमो! पाहा VIDEO

Pune Politics : पुण्याच्या राजकारणात उलथापालथ; भाजपच्या अनुप मोरे यांचा अखेर राजीनामा

Maharashtra Live News Update: जुबेर हंगरेकर याच्या संपर्कातील तरुण सोलापुरातून ताब्यात

Tandalachi Kheer Recipe : गोड खाण्याची इच्छा होतेय? फक्त १० मिनिटांत बनवा तांदळाची खीर

Gayatri Datar Photos: गायत्री दातारचं सौंदर्य, पाहताच जीव दंगला, रंगला...

SCROLL FOR NEXT