google
देश विदेश

Hindenburg : अदानी उद्योगसमुहात सेबीप्रमुखांची गुंतवणूक; हिंडेनबर्गचा नवा बॉम्बगोळा

Adani Group : भारतात लवकरच काही मोठे घडणार, अशी पोस्ट केल्यानंतर हिंडनबर्ग रिसर्चने थेट सेबीच्या अध्यक्ष माधवी बुच त्यांचे पती धवल बुच यांच्यावर गंभीर आरोप केलेत. अदानी घोटाळ्यातील बनावट परदेशी कंपन्यांमध्ये माधवी पुरी बुच आणि त्यांच्या पतीची भागीदारी असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्चने केला आहे. विरोधकांनी यावरुन केंद्र सरकारला घेरलंय. पाहूया एक रिपोर्ट

Girish Nikam

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या नवीन आरोपांनी देशातील आर्थिक आणि राजकीय क्षेत्र ढवळून निघालंय. हिंडेनबर्गनं यावेळी थेट सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनाच लक्ष केलंय.

अदानी घोटाळ्यासाठी वापरलेल्या दोन्ही बनावट परदेशी फंडांत या दोघांची भागीदारी असल्याचा आरोप ‘हिंडेनबर्ग रिसर्च’नं केला आहे. माधुरी पुरी बुच यांचे अदानी उद्योगसमूहात हितसंबंध गुंतलेले असल्याने त्यांनी या उद्योगसमूहावर १८ महिन्यांपासून कारवाई करणे टाळलं, असंही हिंडेनबर्गनं म्हटलंय.

हिंडेनबर्गच्या या ताज्या रिपोर्टवरुन आर्थिक जगतात खळबळ उडाली आहे. विरोधकही आक्रमक झालेत. पंतप्रधान स्वतः या कटाचा एक भाग आहेत असा आरोप करत जेपीसी म्हणजेच संयुक्त संसदीय समितीकडून चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. मात्र सेबीच्या अध्यक्ष माधवी बुच आणि त्याचे पती धवल बुच यांनी हिंडेनबर्गचे आरोप फेटाळून लावलेत.

10 ऑगस्ट 2024 च्या हिंडनबर्ग अहवालात आमच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही या निराधार आरोपांचे खंडन करतो. त्यात तथ्य नाही. आमचे जीवन आणि आर्थिक परिस्थिती खुल्या पुस्तकासारखी आहे. सर्व आर्थिक कागदपत्रे दाखवण्यात आम्हाला कसलाही संकोच नाही. सेबीच्या कारणे दाखवा नोटीस आणि कारवाईला प्रत्युत्तर म्हणून हिंडेनबर्गने हा 'चारित्र्यहननाचा प्रयत्न' केला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चचं भूत मोदी सरकारच्या मानगुटीवर बसलं आहे. यातून पंतप्रधान मोदी आणि भाजप आपली कशी सुटका करुन करणार ? याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT