राजेश एक्सपोर्ट्समध्ये LIC ची सुमारे 10.80 टक्के हिस्सेदारी असून कंपनीत 347 रुपये कोटींची गुंतवणूक आहे
SEBI ने कंपनीचे प्रवर्तक राजेश मेहता यांच्यावर निधीच्या कथित गैरवापराचे गंभीर आरोप केलेत
कारवाईनंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली
LIC च्या गुंतवणुकीबाबत चर्चा सुरू असली तरी पॉलिसीधारकांच्या पैशांवर थेट परिणाम होणार
जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. असं ब्रीदवाक्य घेऊन एलआयसीनं देशातील कोट्यवधी नागरिकांना विमा संरक्षण दिलंय. मात्र, आता याच विमा काढणाऱ्या एलआयसीला मोठा झटका बसलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे? एलआयसीचे शेकडो कोटी रुपये कुणी बुडवले आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
ना चिंता, ना फिकर असं ब्रीदवाक्य घेऊन देशभरात लोकांचे वीमा काढणाऱ्या LIC ला आता राजेश एक्सपोर्ट्स कंपनीमुळे मोठा झटका बसलाय. कारण एलआयसीचे 300 कोटी रुपये बुडल्यात जमा आहेत. होय एलआयसीलाच शेकडो कोटींचा गंडा घालण्यात आलाय. देशातल्या अनेक सर्वसामान्य कुटुंबानी ज्या एलआयसीच्या जिंदगी के साथ आणि जिंदगी के बाद भी वर भूलुन विमा काढला त्याच एलआयसीचे कोट्यावधी रुपये आता शेअर बाजारात एका झटक्यात बुडालेत.
देशातील कोट्यवधी पॉलिसीधारकांना धडकी भरवणारा हा घोटाळा काय आहे ते पाहूयात...
राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.80% गुंतवणूक
या कंपनीत LICनं एकूण 347 कोटी गुंतवले
या कंपनीनं 15 लाख कोटींचा खोटा फुगवटा दाखवला
चौकशीनंतर सेबी आणि NSE नं कारवाई करत व्यवहार थांबवण्याचे आदेश दिले
कंपनीचे शेअर्स वर्षभरात 40% घसरले
सेबीच्या कारवाईनंतर शेअरला लोअर सर्किट
सेबीने कंपनीचे प्रवर्तक राजेश मेहता यांच्यावर तब्बल १५ लाख कोटी रुपयांच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केलाय. १५ लाख कोटी! महाराष्ट्राच्या बजेटच्या दुप्पट ही रक्कम आहे. एवढ्या अवाढव्य रकमेचा फुगवटा दाखवून राजेश एक्सपोर्ट्सने एलआयसीच्या पैशांवर डल्ला मारलाय. सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशांना एका पांढर पेशी दरोडेखोरोनं लुटलंय.
त्याच्यावर कारवाई होईल तेव्हा होईल. पण यामुळे एलआयसीत गुंतवलेले सर्वसामान्यांचे पैसे सुरक्षित आहेत त्यांना याचा फटका बसणार नाही याचे स्पष्टिकरण एलआयसीनं तातडीनं देणं गरजेचं आहे. कारण कोट्यवधी लोकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी मोठ्या विश्वासानं एलआयसीत गुंतवली त्या पैशांचे संरक्षण झालेच पाहिजे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.