Narendra Modi SaamTvNews
देश विदेश

घोटाळेबाज लोकांचा ED, CBI सारख्या केंद्रीय यंत्रणांवर दबाव : मोदी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Assembly Elections 2022 : देशातील ५ राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज समोर आले. पाच पैकी चार राज्यात भाजपने मोठा विजय संपादित केला आहे. या विजयानंतर भाजपच्या मुख्यालयात विजय सभा पार पडली. यावेळी बोलताना मोदींनी भाजप (BJP) कार्यकर्त्यांचे आभार मानले. देशात सध्या ईडी (ED), सीबीआय (CBI), आयटी (IT) सारख्या केंद्रीय यंत्रणांकडून राजकीय नेत्यांवर कारवाया केल्या जात आहेत. भाजप विरोधकांवरच प्रामुख्याने या सर्व कारवाया झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. भाजप केंद्रीय यंत्रणांचा सूडबुद्धीने विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापर करत असल्याचा आरोप देशभरातील भाजप विरोधक वारंवार करत असतात.

गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात भाजप विरोधकांवर केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून कारवायांचा सपाटाच सुरु आहे. मात्र, आज विजयी सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. मोदी म्हणाले, घोटाळा करून बसलेले लोक आता तपास सुरू झाल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणत आहेत. त्यांचा देशाच्या तपास यंत्रणांवर विश्वास नाही'.

पुढे बोलताना मोदी म्हणाले, देशात भ्रष्टाचार एक मोठी समस्या आहे. घोटाळे करून बसलेले लोक, घोटाळ्यांचा तपास सुरु झाल्यावर केंद्रीय तपास यंत्रणांवर अविश्वास दाखवून दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. आधी हजारो कोटींचे घोटाळे कार्याचे आणि आता तपास होऊ द्यायचा नाही. तपासापासून लक्ष्य भटकावण्यासाठी जातीपातीचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही मोदी यांनी केला.

भ्रष्टाचाराविरोधात आम्ही करत असलेल्या कारवाया रोखण्याचे षडयंत्र काही लोक करत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायला हवा की नको? असा सवाल उपस्थित करत आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधी द्वेष असल्याचे मोदी म्हणाले. देशाच्या कमाईला लुटून आपली तिजोरी भरण्याची प्रवृत्तीची काही लोकांची ओळख बनली असल्याची टीकाही मोदी म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

SCROLL FOR NEXT