Satish Kaushik Death saam tv
देश विदेश

Satish Kaushik Death: 'माझ्या नवऱ्याने 15 कोटींसाठी केली सतीश कौशिक यांची हत्या', महिलेची पोलिसांत तक्रार

Satish Kaushik Death:सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फार्महाऊसवर पार्टीत सहभागी झालेल्या 25 लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

Chandrakant Jagtap

Satish Kaushik Death: चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सतीश कौशिक आता या जगात नाहीत. ६६ वर्षीय सतीश कौशिक यांचे मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर एका महिलेने खळबळजनक दावा केला आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एका महिलेने तिच्या पतीने कौशिक यांची 15 कोटी रुपयांसाठी हत्या केल्याचा दावा केला आहे. याबाबात तिने दिल्ली पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार देखील दाखल केली आहे. कौशिक पैसे परत मागत होते आणि माझा पती ते परत देऊ इच्छित नव्हता, त्यामुळे त्याने कौशिक यांची औषधं देऊन हत्या केली असा धक्कादायक आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

दरम्यान याआधी शनिवारी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील फार्महाऊसमधून पोलिसांनी काही 'ड्रग्ज' जप्त केली आहेत, याच ठिकाणी कौशिक मृत्यूपूर्वी एका पार्टीत सहभागी झाले होते. त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तक्रारदार महिलेने सांगितले की, तिने 13 मार्च 2019 रोजी व्यावसायिकाशी लग्न केले होते. तिच्या पतीने सतीश कौशिकशी तिची ओळख करून दिली होती. कौशिक त्यांना भारत आणि दुबईमध्ये नियमित भेटत असे. 23 ऑगस्ट 2022 रोजी कौशिक दुबईतील त्यांच्या घरी आले होते आणि पतीकडून 15 कोटी रुपयांची मागणी केली होती असा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. (Latest Marathi News)

या महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मी ड्रॉईंग रूममध्ये होते आणि तिथे कौशिक आणि माझे पती दोघांचा वाद सुरू होता. आपल्याला पैशांची नितांत गरज असल्याचे कौशिक सांगत होते. त्यांनी माझ्या पतीला गुंतवणुकीसाठी १५ कोटी रुपये दिले होते आणि त्याला तीन वर्षे झाली आहेत. कौशिक असे देखील म्हणाले होते की कोणतीही गुंतवणूक केली गेली नाही आणि त्यांचे पैसे परत देखील दिले नाही, त्यामुळे त्यांना फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे.

दुबईतील एका पार्टीतील व्यवसायिक आणि कौशिक यांचा फोटोही महिलेने शेअर केला आहे. या पार्टीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मुलगाही उपस्थित असल्याचा दावा महिलेकडून करण्यात आला आहे. तक्रारीत महिलेने असे देखील म्हटले की, तिचा पती अनेक प्रकारच्या ड्रग्जचा व्यवसाय करतो.

महिलेने सांगितले की, माझ्या पतीने कौशिकला लवकरच पैसे परत करीन असे वचन दिले होते. जेव्हा मी माझ्या पतीला काय प्रकरण आहे ते विचारले तेव्हा त्यांने सांगितले की कोविड महामारीच्या काळात त्यांने कौशिक यांचे पैसे गमावले. माझ्या पतीने सांगितले की तो कौशिकपासून सुटका करण्याचा विचार करत आहे असा आरोप देखील महिलेने केला आहे.

तक्रारदार महिलेने सांगितले की, 24 ऑगस्ट 2022 रोजी तिच्या पतिचा कौशिक यांच्यासोबत पैशांवरून जोरदार वाद झाला होता. मी कौशिक यांना माझ्या पतीला प्रॉमिसरी नोट दिल्याचे सांगताना ऐकले होते. त्यानंतर आता कौशिक यांच्या मृत्यूची बातमी वाचली. मला दाट संशय आहे की माझ्या पतीनेच त्याच्या साथीदारांसोबत कट रचला आणि कौशिक यांना पैसे परत करावे लागू नयेत म्हणून त्यांना गुंगीचे औषध पाजले, असा दावा महिलेने केला आहे.

याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फार्महाऊसवर पार्टीत सहभागी झालेल्या 25 लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosquitoes : दारू पिणारे डासांना चावायला आवडतात? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Manoj Jarange : 'मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा'; कुणी केली सरकारकडे मागणी? VIDEO

Liver Cancer Symptoms: तुम्हाला सामान्य वाटणारी ही लक्षणं असून शकतात लिव्हर कॅन्सरची; शरीराच्या 'या' बदलांवर लक्ष द्या

Pratap Sarnaik : 'मी हिंदी बोलतो, तुम्हीही बोला', सरनाईकांच्या हिंदी भाषिकांसाठी पायघड्या

Maratha Reservation : अखेर मराठा समाजाला मोठा दिलासा, उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT