Singapore Air show 2024 Saam TV
देश विदेश

Sarang Helicopter: परदेशातही दिसणार भारतीय हवाई दलाची ताकद! ‘सिंगापूर एअर शो 2024’ साठी सारंग हेलिकॉप्टर प्रदर्शन संघ सज्ज

साम टिव्ही ब्युरो

Singapore Air show 2024:

भारतीय हवाई दाची ताकद आता परदेशात दिसणार आहे. भारतीय हवाई दलाच्या (आएएफ) सारंग हेलिकॉप्टर प्रदर्शन संघाने 18 फेब्रुवारी 2024 रोजी पहिले सराव प्रदर्शन केले होते. याआधी म्हणजे 12 फेब्रुवारी 2024 रोजी हा संघ सिंगापूरला पोहोचला. रिपब्लिक ऑफ सिंगापूर हवाई दलाच्या (आरएसएफ) चांगी हवाई तळावरून या प्रदर्शनासाठी संघ कार्यरत आहे.

सिंगापूर एअरशो 20 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू होणार आहे. या एअरशोमध्ये जगभरातील हवाई प्रदर्शन करणारे विविध संघ सहभागी झाले आहेत. या शोमध्ये अग्रगण्य विमान आणि विमानाची कार्यप्रणाली निर्माण करणारे तसेच, प्रणाली चालक आपली उत्पादने प्रदर्शित करणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारताच्‍या सारंग संघाने यंदाच्या प्रदर्शन कार्यक्रमामध्‍ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल), निर्माण केलेले ध्रुव या प्रगत आणि वजनाने हलक्या हेलिकॉप्टरचे पहिल्यांदाच प्रदर्शन करण्‍यात येणार आहे. सारंग संघाने आपले पहिले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन याआधी 2004 मध्ये सिंगापूरच्या चांगी प्रदर्शन केंद्रामध्‍ये आशियाई एरोस्पेस एअर शोमध्‍ये केले होते. (Latest Marathi News)

सारंग संघाकडून यावर्षी सिंगापूर एअरशोमध्ये प्रेक्षकांसाठी चार हेलिकॉप्टरचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्‍यानुसार प्रदर्शनामध्ये ध्रुवमध्‍ये असलेली चपळाई तसेच या हेलिकॉप्टरची यंत्रणा हाताळणा-या भारतीय हवाई दलाच्‍या वैमानिकांमध्‍ये असलेले उच्च दर्जाचे कौशल्य अधोरेखित होणार आहे.

स्वदेशी बनावटीचे ध्रुव आणि त्याचे अत्याधुनिक, प्रगत विविध प्रकार भारताच्या सर्व लष्करी सेवांमध्‍ये वापरले जात आहेत. सिंगापूर एअर शो या व्‍यासपीठाचा वापर करून, त्‍याव्दारे यशस्वी प्रदर्शन करून भारताने संरक्षण क्षेत्रामध्‍ये आत्‍मनिर्भर बनण्‍यासाठी जे कार्य केले आहे, त्‍याची यशोगाथा जगामध्‍ये पोहोचवणे शक्य होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Cancelled: पुण्यातून धावणाऱ्या तब्बल १० रेल्वेगाड्या रद्द; अनेकांचे मार्ग बदलले; कारण काय?

Mahalakshmi Yog: ३ दिवसांनी बनणार पॉवरफुल महालक्ष्मी योग; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Maharashtra News Live Updates : धनगर आंदोलनाचे पडसाद, पुणे- इंदापूर महामार्ग रोखला

Navra Mazha Navsacha 2 Collection: सुप्रिया-सचिन अन् अशोम मामांची जोडी बॉक्स ऑफिसवर गाजली; 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Vande Bharat Express : नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतचं वेळापत्रक काय? कोणत्या मार्गावर धावणार, कुठे किती वेळ थांबते? घ्या जाणून

SCROLL FOR NEXT