Sanjay Raut And Sandeep Deshpande Saam Tv
देश विदेश

...तर त्यांचा नंबर राजकारणात ‘ढ’ पेक्षा खाली; संदीप देशपांडेंच्या टीकेला राऊतांचं उत्तर

सतत तीन वेळा देशातील पाच मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले आहेत. हे जर कुणाला कळत नसेल तर त्यांचा नंबर राजकारणात ढ पेक्षा खाली मानावा लागेल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मनसे ही भाजपची (BJP) सी टीम असल्याची खोचक टीका केली. तर यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना (Shivsena) राष्ट्रवादीची ढ टीम असल्याचं प्रत्युत्तर दिले आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मनसेवर जोरदार टीका केली.

हे देखील पहा -

शिवसेना राष्ट्रवादीची ढ टीम असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, कोणती कोणाची टीम आहे हा त्यांचा प्रश्न आहे. तोंडाच्या कोणत्या वाफा दवडायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवेसना मेरिटमध्ये आली आहे आणि त्यामुळेच राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. राज्याचं नेतृत्व शिवसेना करते याचा अर्थ शिवसेनेला राजकारण उत्तम कळतं, शिवसेनेत निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यामुळेच राज्यातील जनतेचा शिवसेनेला पाठिंबा आहे. सतत तीन वेळा देशातील पाच मुख्यमंत्र्यांच्या टॉप लिस्टमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले आहेत. हे जर कुणाला कळत नसेल तर त्यांचा नंबर राजकारणात ढ पेक्षा खाली मानावा लागेल, अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मनसेवर पलटवार केला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

SCROLL FOR NEXT