Sanjay Raut press conference: राष्ट्र्वादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार त्यांच्या पक्षाबाबत बोलली असतील, मला माहिती नाही असे राऊत म्हणाले. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राऊत यांनी भीमा पाटस कारखाणा, कर्नाटक निवडणुका आणि सत्यपाल मलिक यांच्या आरोपांसंदर्भात प्रतिक्रिया दिल्या.
भीमा पाटस कारखाना प्रकरणात कारवाई होईल की नाही माहित नाही. सध्या देशात एकतर्फी कारवाई होते. कलम १४४ लावण्यात आलं. आम्हाला अडवण्यात आलं. तो कारखाना नवाझ शरीफचा आहे का? ५०० कोटी चं मनी लॉंड्रीग आहे, दादा भूसे यांनी देखील १०० कोटींचं मनी लॉंड्रीग केलं असाही आरोपी संजय राऊत यांनी केले आहे. दादा भूसे आणि राहुल कुल यांचे पुरावे मी दिल्लीत इडी आणि सीबीआयला देणार आहे. कारवाई झाली नाही तर कोर्टात जाऊ, आम्ही आजिबात मागे हटणार नाही असे राऊत यांनी सांगितले.
'विरोधकांना धमकावलं जातय'
मुख्यमंत्र्यांवर बोलताना राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुट्टीवर असतील हा त्यांचा प्रश्न आहे, पण राज्य कधी सुट्टीवर जात नाही आणि विरोधी पक्षही सुट्टीवर जात नाही असे राऊत म्हणाले. तसेच विरोधी पक्षातील लोकांना त्यांच्या मुला-मुलींना, पत्नीला २० ते २५ लाख रूपयासाठी बोलावून धमकावलं जातं. भाजपमध्ये सामील व्हा असं सांगितलं जातं, हे लवकरच मी बाहेर आणणार आहे असे देखील राऊत म्हणाले. (Latest Political News)
'लोकांना हा विनाशकारी प्रकल्प नको'
बारसू रिफायनरी प्रकल्पाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, लोकांना हा विनाशकारी प्रकल्प नको आहे. लोक रस्त्यावर आहेत. या लोकभावनेचा आदर सरकार करणार नसेल तर लोकशाहीला काय अर्थ आहे असा सवाल त्यांनी केला. तसेच या प्रकल्पाचं समर्थन करणारे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याशी पक्षांतर्गत चर्चा केली जाईल असे राऊत म्हणाले. (Maharashtra Politics)
सत्यपाल मलिकांच्या दाव्यावर काय म्हणाले?
पुलवामा प्रकरणात सत्यपाल मलिक यांनी जे काही गौप्यस्फोट केले आहेत ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाचे आहेत. हा विषय देशात पोहोचू नये यासाठी माध्यमांवर दबाव आणण्यात आला. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा असे राऊत म्हणाले.
'भाजपचा दारूण पराभव होताना दिसतोय'
कर्नाटकात भाजपचा दारूण पराभव होताना दिसत आहे. १३ मे नंतर देशात राजकीय घडामोडी सुरू होतील. कर्नाटकात काँग्रेस जिंकली तर दंगली होतील हे देशाचे गृहमंत्री म्हणतात हे धक्कादायक आहे. ही धमकी आहे का? आम्हाला मतदान करा नाहीतर दंगली होतील ही धमकी आहे. तुम्ही कायदा आणि सुवस्थेवर बोलायला हवं. दंगली होतील हे देशाच्या गृहमंत्र्यांचं दुर्दैवी विधान आहे असे राऊत म्हणाले. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.