German Magazine Cartoon: जर्मन मासिकात भारताच्या लोकसंख्येवर वादग्रस्त व्यंगचित्र, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं

Controversial Cartoon: भारताची लोकसंख्या चीनला मागे टाकत असल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे.
German Magazine Controversial Cartoon
German Magazine Controversial Cartoonsaam tv

German Magazine Controversial Cartoon: भारत नुकताच जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. याची खिल्ली उडवत जर्मनीच्या डेर स्पीगल मासिकाने एक व्यंगचित्र प्रकाशित केले आहे. भारताची लोकसंख्या चीनला मागे टाकत असल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे.

यानंतर डर स्पीगलवर वर्णद्वेषी व्यंगचित्रे प्रकाशित केल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर नेकटकऱ्यांनी या मासिकाचा समाचार घेतला आहे. डेर स्पीगल सर्जनशील स्वातंत्र्याच्या वेषात त्यांचे वर्णद्वेषी विचार लपवू शकला नाही अशी टीका या मासिकावर केली जात आहे.

German Magazine Controversial Cartoon
Sharad Pawar News: …पुन्हा भाकरी फिरवण्याची वेळ आलीय; शरद पवारांचे सूचक विधान

व्यंगचित्रात नेमकं काय?

या वादग्रस्त व्यंगचित्रात दोन रेल्वे गाड्या दाखवल्या आहेत. एका बाजूला जीर्ण जुनी भारतीय रेल्वे दाखववण्यात आली असून ती प्रवाशांनी खचाखच भरलेली दाखवली गेली आहे. या रेल्वेवर लोक भारतीय तिरंगा घेऊन बसलेले आहेत. तर दुसरीकडे चीनची बुलेट ट्रेन एका वेगळ्या ट्रॅकवर दिसत आहे. त्यात फक्त दोन चालक बसलेले दाखवण्यात आहेत.

या व्यंगचित्राच्या माध्यमातून चीनची तांत्रिक प्रगती दाखवण्यात आली आहे, तर भारताला मुद्दाम गरीब आणि पायाभूत सुविधां अभाव असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे.

भारताचे मंत्री भडकले

संताप व्यक्त करताना इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. येत्या काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीपेक्षा खूप मोठी असेल असे त्यांनी ट्वीट त्यांनी केले. "प्रिय व्यंगचित्रकार डेर स्पीगल भारताची खिल्ली उडवण्याचा तुमचा प्रयत्न असूनही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताविरुद्ध पैज लावणे स्मार्ट नाही, काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीपेक्षा मोठी होईल".

German Magazine Controversial Cartoon
Mumbai Crime: धक्कादायक! राहत्या घरात आढळला महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह; गेल्या दीड वर्षापासून...

काही भारतीयांनी हे कार्टून योग्य असल्याचे म्हटले

काही भारतीयांनी हे व्यंगचित्र योग्य असल्याचे सांगितले आहे. लाखो भारतीय सणांच्या वेळी घरी जातात हे खरे आहे, त्यामुळे काही गाड्या या कार्टूनसारख्या दिसतात अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. (Latest Marathi News)

चीनपुढे नमते घेणे हा त्यांचा उद्देश

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनीही या व्यंगचित्रावर टीका केली आहे. हे अतिशय वर्णद्वेशी असल्याचे त्यांनी सांगितले. डेर स्पीगलने भारताचे केलेले हे चित्रण वास्तवाशी साधर्म्य दाखवत नाही. भारताला अपमानित करून चीनपुढे नमते घेणे हा त्यांचा उद्देश आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये भारताच्या यशस्वी मंगळ मोहिमेची खिल्ली उडवणाऱ्या वर्णद्वेषी व्यंगचित्रापेक्षा हे वाईट आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com