Sanatan Sangh president Updesh Rana receives a bomb threat on WhatsApp amid rising tension after Delhi car blast. saam tv
देश विदेश

'तेरी गाड़ी को हम ब्लास्ट करेंगे! सनातन संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बॉम्बने उडवण्याची धमकी

Sanatan Sangh Chief Receives Bomb Threat : सनातन संघाचे अध्यक्ष उपदेश राणा यांना व्हॉट्सअॅपवरून जीवे मारण्याची धमकी आलीय. त्यांच्या कारला बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी शाहरुख नावाच्या एका व्यक्तीने फोनवरून दिलीय. याबाबत नंदुरबार जिल्ह्यात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Bharat Jadhav

  • सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांना व्हॉट्सअॅपवरून धमकी देण्यात आलीय.

  • धमकी मिळाल्यानंतर उपदेश राणा शहादा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

  • दिल्ली स्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

दिल्लीमध्ये एका धावत्या कारमध्ये स्फोट घडल्यानंतर देशभरात दहशतीचं वातावरण आहे. देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झालीय. अनेक राज्यात तपास यंत्रणेकडून छापेमारी केली जात आहे. त्याचदरम्यान सनातन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपदेश राणा यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलीय. ही धमकी व्हॉट्सअॅप कॉलवरून देण्यात आलीय.

उपदेश राणा हे सुरतहून बागेश्वर धामला जात होते, त्यावेळी त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपवर कॉल आला. कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीनं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. गुजरातहून महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करताच नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा जवळ आल्यानंतर त्यांना धमकीचा कॉल आला. धमकी आल्यानंतर उपदेश राणा यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलीस स्टेशन गाठत अज्ञात कॉल करणाऱ्या विरोधात तक्रार दिली आहे.

उपदेश राणा हम तुझपर नजर रखे हुए है.तुने अभी महाराष्ट्र मे एन्ट्री की है.पुलिस की, गाडी तेरे साथ चल रही है. पुलीस की गाडी को भी और तेरी गाडी को भी हम ब्लास्ट करंगे.. मै आयएसआय से शाहरुख बोल रहा हु। अशा पद्धतीचा धमकीचा व्हाट्सअप कॉल त्यांना आला होता. उपदेश राणा हे त्यांच्या मित्रासोबत गुजरातच्या सुरतहून बागेश्वर धामला आपल्या कारने जात होते. त्यावेळी धमकीचा कॉल आला होता. 7508064890 या नंबरवरून त्यांना धमकीचा कॉल आला. याप्रकरणी उपदेश राणा यांनी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. आपल्या तक्रारीत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात भाजपला धक्का,नेत्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

कोकणात महायुतीत वादाची ठिणगी, शिवसेनेविरोधात भाजप आक्रमक; माजी आमदारासह ३९ पदाधिकाऱ्यांचा राजीनाम्याचा इशारा

Kalyan News: धक्कादायक! १९ व्या मजल्यावरून उडी घेत १४ वर्षीय मुलीची आत्महत्या, हृदय हेलावणारी घटना सीसीटीव्हीत कैद

Palghar Tourism : वीकेंडला करा जोडीदारासोबत ट्रेकिंगचा प्लान, पालघरमध्ये आहे सुंदर डेस्टिनेशन

महायुतीत पुन्हा एकदा बिघाडी! भाजप-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत क्षुल्लक कारणावरुन वाद

SCROLL FOR NEXT