Samudrayaan Saam TV
देश विदेश

Samudrayaan: पाण्यात लपलेलं रहस्य उलगडणार! चंद्र आणि सूर्यानंतर भारताचं मिशन समुद्रयान

समुद्राच्या आत खोलवर कोबाल्ट, निकेल आणि मँगनीज असे धातू सापडतात का? याचा शोध घेतला जाणार आहे.

Ruchika Jadhav

Matsya 6000:

भारताने चांद्रयान ३ मार्फत चंद्रावर यशस्वीरीत्या पहिलं पाऊल ठेवलं आहे. चंद्राची पाहाणी करत असताना पुढच्या आठवड्यात लगेचच सूर्ययान पाठवण्यात आले. चंद्र आणि सूर्यानंतर आता भारत समुद्रात खोलवर जाऊन त्याची खोली मोजणार आहे. तसेच समुद्रातील पाण्यात कोणकोणते गुणधर्म आहेत. याबाबात अधीक माहिती शोधणार आहेत. (Latest Marathi News)

मिशन समुद्रयानात जे यान खाली पाठवले जाणार आहे त्याचे नाव मत्स्य ६००० असे आहे. या समुद्रयानातून तीन भारतीय संशोधक समुद्रात पाठवले जातील. मत्स्य ६००० ही पाणबुडी समुद्रात तब्बल ६ किलोमीटरपर्यंत जाणार आहे. येथे संशोधक विविध धातूंचा शोध घेणार आहेत. समुद्राच्या आत खोलवर कोबाल्ट, निकेल आणि मँगनीज असे धातू सापडतात का? याचा शोध घेतला जाणार आहे.

गेल्या २ वर्षांपासून पाणबुडीचे बांधकाम सुरू

मत्स्य ६००० चे गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू होते. साल २०२४ च्या सुरुवातीला समुद्रयानाची चाचणी होणार आहे. चेन्नईच्या किनाऱ्यावरून बंगालच्या उपसागरात चाचणी केली जाणार आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने जून २०२१ मध्ये या मोहीमेला सुरूवात केली. सागरी संसाधनांची माहिती या संशोधनातून घेतली जाणार आहे. या पाणबुडीसाठी तब्बल ४१०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. समुद्रयान समुद्रातील संपूर्ण खोली देखील मोजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तुम्हाला तात्या विंचू येऊन चावेल'; मोदीभक्त महेश कोठारेंना राऊतांचा टोला

किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Shocking : सुतळी बॉम्ब फोडताना घात झाला, एका चुकीमुळे तरुणाचा जीव गेला, ऐन दिवाळीत कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी

Raigad Politics: रायगडमधील राजकारणात मोठी उलथापालथ; राष्ट्रवादीचा नेता फुटला;भरत गोगावलेंनी खेळला मोठा डाव

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

SCROLL FOR NEXT