किती गोंडस ती! रणवीर-दीपिका पादुकोणने पहिल्यांदा दाखवला मुलगी दुआचा चेहरा

Bharat Jadhav

दीपिका-रणवीरची दिवाळी

संपूर्ण देश दिवाळीचा साण उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आपापल्या अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनीही खास पद्धतीने दिवाळी साजरी केलीय.

खास फोटो शेअर

दोघांनी सोशल मीडियावर ऐथनिक ड्रेसमधील स्वतःचे फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यांची मुलगी दुआ पदुकोण सिंगचा फोटोही शेअर केलाय.

दुआचा फोटो पाहिला का?

दीपिका पदुकोणने तिची मुलगी दुआ पदुकोणसोबतचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोंमध्ये ती तिच्या मुलीला मांडीवर घेऊन बसलीय.

दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

रणवीर सिंगने आणि दीपिकाने दुआला हातात उचलेले आहे. दोघेही आनंदी दिसत आहेत. फोटो शेअर करताना दीपिकाने "दिवाळीच्या शुभेच्छा." असे कॅप्शन दिले आहे.

फोटोवर सेलिब्रिटींच्या कमेंट्स

अनेक सेलिब्रिटींनी दीपिका पदुकोणच्या फोटोला लाईक आणि कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री पत्रलेखाने दुआला क्यूट म्हटलंय. तर अभिनेता राजकुमार रावने लिहिले, "खूप गोंडस. देव तुम्हा सर्वांचे रक्षण करो."

दीपिका-रणवीरचं लग्न कधी झालं होतं?

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचे लग्न १४ नोव्हेंबर २०१८ रोजी झाले. ८ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना मुलगी झाली.

रणवीर दिसणार पडद्यावर

रणवीर लवकरच आदित्य धर दिग्दर्शित "धुरंधर" चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना यांच्याही भूमिका आहेत.

दीपिकाचे नवे सिनेमे कोणते?

दीपिका अल्लू अर्जुनसोबत 'AA22xA6' चित्रपटात दिसणार आहे. ती शाहरुख खान आणि सुहाना खान अभिनीत 'किंग' चित्रपटात देखील दिसणार आहे.