भारताचं आदित्य एल-1 यानाने सूर्याच्या दिशने वाटचाल सुरु केली आहे. आदित्य एल-1 यानाने पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. आदित्य एल-१ आता पृथ्वीच्या अंडाकार कक्षेत प्रवेश करत पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारत आहे. त्यानंतर आदित्य एल-१ हे १५ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या नव्या कक्षेत जाणार आहे. यामुळे या मिशनसाठी १५ सप्टेंबर दिवस महत्वाचा असणार आहे. (Latest Marathi News)
१५ सप्टेंबर रोजी यान काय करणार?
'एबीपी'ने दिलेल्या वृत्तानुसार, आदित्य एल-१ हे एक मागोमाग एक कक्षा पार करत सूर्याजवळ पोहोचत आहे. इस्रोचं आदित्य एल-१ आता पृथ्वीपासून ७१, ७६७ किलोमीटर दूर अंतरावर आहे. आदित्य एल-१ हे यान आता १५ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या चौथ्या कक्षेत जाणार आहे. यानंतर या मोहीमेचा नवा प्रोजेक्ट सुरू होणार आहे. (ADITYA-L1 Mission information )
15 सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ यान नव्या कक्षेत प्रवेश करणार आहे. तसेच यानाच्या वेगात बदल होणार आहे. त्याचबरोबर या यानाचा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न असणार आहे.
सूर्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आदित्य एल-१ यानाचा १५ सप्टेंबरनंतर वेग वाढविण्यात येणार आहे. तसेच सूर्याकडे जाण्याची दिशा देखील निश्चित करण्यात येणार आहे. (Latest News In Marathi)
१८ सप्टेंबर रोजी आदित्य एल-१ यान हे पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर जाणार आहे. त्या भागात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कमी असतो. त्यानंतर हे यान अशा पॉइंटवर पोहोचेल, जिथे पृथ्वी आणि सूर्याची उर्जा कमी असते. त्या ठिकाणी आदित्य एल- १ पोहोचल्यानंतर सूर्यातून निघणारे किरण आणि सौर स्फोटाचा अभ्यास करण्यात येईल.
तत्पूर्वी, आदित्य एल-१ यानाचा पाच टप्प्यांमध्ये सूर्याच्या दिशेने प्रवास करणार आहे. पीएसएसव्ही रॉकेटच्या माध्यमातून हे यान सूर्याच्या दिशेने जात आहे. आदित्य एल-१ यांनाच्या संपूर्ण प्रकियेस चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. पण पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करणार आहे.
या मोहिमेद्वारे सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर परिणाम, ओझोनचा थर, अंतराळातील हवामान, सौरवादळे आणि त्याचा परिणाम सर्व बाबींचा अभ्यास करण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.