BJP flags  Saam Tv
देश विदेश

मुख्यमंत्री राज्यसभेवर जाणार; भाजपकडून रिक्त खुर्चीवर कोणाला संधी मिळणार? ४ जणांची नावे चर्चेत

bihar political news : बिहारचे मुख्यमंत्री राज्यसभेवर जाणार असल्याचे निश्चित झालं आहे. यामुळे या रिक्त जागेवर कोण विराजमान होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय

बिहारमध्ये सत्ताबदल होण्याची शक्यता

भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी चार प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत

बिहारमध्ये सत्ता परिवर्तनाची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी स्वत: राज्यसभेची निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. यामुळे बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे.

भाजप धक्कातंत्रासाठी प्रसिद्ध आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्रि‍पदासाठी अनेक नावांची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पटना येथे पोहोचले आहेत. नितीश कुमार यांचा अर्ज भरण्यासाठी भाजप अध्यक्ष नितीन नबीन देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

बिहारमध्ये एनडीए सरकारला अद्याप ६ महिने देखील पूर्ण झालेले नाहीत. त्यातच नितीश कुमार यांनी पटनाहून दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिहारमध्येही सत्तापालट होणार असल्याचं बोललं जात आहे. नितीश कुमार यांच्या जागी बिहारचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेत कोण आहे?

भाजपकडून मुख्यमंत्रि‍पदासाठी दिलीप जायसवाल, सम्राट चौधरी, संजीव चौरसिया आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांची नावे चर्चेत आहेत. या व्यतिरिक्त इतर नावांची देखील चर्चा सुरू आहे. परंतु बिहारच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. भाजपकडून बिहारच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचं नाव अधिक चर्चेत आहे.

सम्राट चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा

बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाव आघाडीवर आहे. सम्राट चौधरी हे ओबीसी वर्गातील कुशवाहा समाजातून येतात. त्यांनी मागील अनेक वर्षांपासून संघटन, सरकार पातळीवर चांगली कामगिरी केली आहे. परंतु बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे येत्या दिवसांत स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT