Sp workers beaten to maulana  Saam tv
देश विदेश

Maulana Controversy : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर वादग्रस्त वक्तव्य; कार्यकर्त्यांनी मौलानाला स्टुडिओमध्ये चोपलं, VIDEO व्हायरल

Maulana beaten up by sp workers : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा राडा झाला. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मौलानाला माराहण केली.

Vishal Gangurde

मौलाना साजिद रशिदी यांनी खासदार डिंपल यादव यांच्या पोशाखावर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला.

समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मौलानाला एका स्टुडिओमध्ये मारहाण केली.

या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी, खासदार डिंपल यादव यांच्या पोशाखावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मौलाना साजिद रशीदी यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. एका न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये मौलाना साजिद यांना मारहाण झाली. मौलाना साजिद यांना समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कानशिलात लगावल्याची माहिती मिळाली आहे.

मौलाना साजिद यांच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, समादवादी पक्षाचे कार्यकर्ते मौलाना साजिद यांना घेरतात. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी थेट मौलाना साजिद यांना मारहाण केली. सपाचे प्रवक्ते श्याम सिंह भाटी, मोहित नागर, प्रशांत भाटी यांनी मौलाना साजिद यांना मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे.

आम्ही राष्ट्रीय नेत्याचा अपमान सहन करू शकत नाही, असं म्हणत कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांना मारहाण केल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. काही दिवसांपूर्वी मौलाना साजिद यांनी खासदार डिंपल यादव यांच्या कपड्यांवर टिप्पणी केली होती. या टिप्पणीनंतर मौलाना यांना मारहाण झाल्याचे समोर आलं आहे.

मौलाना साजिद रशिदी यांनी मशिदीच्या दौऱ्यावर असलेल्या महिला खासदाराच्या पोशाखावर टिप्पणी केली होती. मौलाना यांनी म्हटलं होतं की, 'मी एक फोटो दाखवतो. तो फोटो पाहून लाज वाटेल. मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही. कारण सर्वजण त्यांना ओळखतात. एकाने मुस्लिम महिलेसारखे कपडे परिधान केले होते. तिच्या डोक्यावर पदर होता. दुसरी महिला डिंपल यादव होती. त्यांचाही फोटो पाहू शकता. त्यांची पाठ दिसत आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: नगरपालिका, नगरपंचायतींवर यंदा 'लाडकी'ची सत्ता, कोणकोणत्या ठिकाणी असणार महिलाराज? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra News : निवडणुकीआधी ‘गुलाबी पंचा’मुळे पुन्हा चर्चा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा लूक आला समोर

Shocking: मुलगा गाढ झोपेत, मध्यरात्री बाप आला अन् गळा चिरला; पोटच्या गोळ्याच्या जिवावर जन्मदाता का उठला?

Prostate Cancer Diet: दीर्घकाळ बसून राहणाऱ्यांना होऊ शकतो प्रोस्टेट कॅन्सर; धोका टाळण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra Live News Update : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर द बर्निंग बाईकचा थरार

SCROLL FOR NEXT