Parliament Session 2024  Saam tv
देश विदेश

Parliament Session 2024 : तोकड्या कपड्यांवर रील्स बनवणाऱ्या तरुणींवर खासदार भडकला; थेट राज्यसभेत मांडला मुद्दा,VIDEO

ram gopal yadav in Parliament Session 2024 : तोकड्या कपड्यांवरून रील्स बनवणाऱ्या तरुणींवर खासदार भडकले. खासदार राम गोपाल वर्मा यांनी थेट राज्यसभेत मुद्दा मांडला.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : सोशल मीडियावर तोकडे कपडे घालून रील्स बनवणाऱ्या तरुणींचा मुद्दा राज्यसभेत पोहोचला आहे. राज्यसभेतील अधिवेशनातील शून्य प्रहरात समाजवादी पक्षाचे खासदार प्राध्यापक रामगोपाल यादव यांनी मंगळवारी तोकडे कपडे घालून रील्स करणाऱ्या तरुणींचा अवतार पाहून लाज वाटते. या रील्समुळे समाजात अश्लीलता वाढते. यामुळे अशा रील्सवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी खासदार रामगोपाल यादव यांनी राज्यसभेत केली आहे. तसेच त्यांनी जनसंघाचा भारतीय संस्कृतीच्या सुरक्षेच्या नाऱ्याची आठवण करून दिली.

खासदार रामगोपाल यादव यांनी म्हटलं की, आमच्या काळात इंग्रजी भाषा इयत्ता सहावीपासून शिकवली जाते. मुलं थोडे शिकल्यानंतर शिकवण घ्यायचे की, 'चारित्र्य म्हणजे सर्वकाही, असं शाळेत सांगण्यात यायचं'. रामगोपाल यादव पुढे म्हणाले, आज काही प्लॅटफॉर्म अश्लीलतेला प्रोत्साहन देत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये इन्स्टाग्राम रील्सचं नाव घेईल'.

समाजवादी पक्षाचे खासदार यादव पुढे म्हणाले की, 'इन्स्टाग्रामवरील विचित्र रील्स पाहण्यात देशातील तरुण सरासरी तीन तास वाया घालवतात. त्यात मालिका आणि कार्यक्रमाचाही समावेश आहे'.

प्लॅटफॉर्म सरकारने बंदी घाला - रामगोपाल यादव

'कुटुंबासोबत एकत्र जेवण केल्याने प्रेम वाढतं. आता मुलं फोन घेऊन तासंतास वाया घालवतात. काही धक्कादायक बातम्याही घडल्या आहेत. आता काही जण इन्स्टाग्रामवरून मैत्री करतात. त्याचप्रकारे एका तरुणाने लग्नानंतर तरुणीची हत्या केली. अशा घटना होत आहेत. अश्लीलता पसरवणारं प्लॅटफॉर्म सरकारने बंद करावे, अशी मागणी यादव यांनी केली.

लहान मुलांना ऑनलाइन गेमिंगचं व्यसन - फौजिया खान

दरम्यान, महाराष्ट्राच्या खासदार फौजिया खान यांनी ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचा मुद्दा उचलला. या ऑनलाइन गेमिंग व्यसनाचा मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका लहान मुलाने आत्महत्या केली होती, अशी माहिती फौजिया खान यांनी दिली. आम आदमी पक्षाचे खासदार विक्रमजीत सिंह साहनी यांनीही सोशल मीडियाद्वारे पसरवणाऱ्या द्वेषाचा मुद्दा उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT