sai baba mandir  Saam Tv
देश विदेश

Sai Baba Controversy : साईबाबा काशीतून हद्दपार! 14 मंदिरांमधून हटवल्या साईंच्या मूर्ती; भक्तांमध्ये संताप,VIDEO

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही

नवी दिल्ली : साईबाबांवरून पुन्हा वाद उफाळून आलाय. यावेळी वाद पेटलाय तो काशीत... काशीच्या मंदिरातून साईबाबांचे फोटो आणि मूर्ती हटवून गंगा नदीत विसर्जित करण्यात आल्या आहेत. तब्बल १४ मंदिरांमधून साईंच्या मूर्ती बाहेर काढण्यात आल्या आहे. त्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडलीय.. हिंदू धर्मीयांनी साईबाबांची पुजा करू नये, अशी मागणी सनातन रक्षक दलाने केलीय. तर साईबाबांची मूर्ती प्रेतपुजा असल्याने मंदिरांमधून हटवण्यात आल्याचा दावा ब्राह्मण सभेने केलाय..

काशीतील मंदिरातून हटवल्या साईंबाबांच्या मूर्ती

महाराष्ट्रासह देशभरात साईबाबांची ख्याती आहे. परराज्यातूनही लाखो लोक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीला जात असतात. मात्र याच साईबाबांना काशीत विरोध करण्यात आलाय. त्याची कारणं काय आहेत? पाहूयात...

काशीत साईबाबांना विरोध का?

साईबाबांची पूजा ही प्रेतपूजा असल्याचं सनातनी धर्मियांचं मत आहे. काशीतील मंदिरांमध्ये 33 कोटी देवी देवता आहेत. देवीदेवतांना मर्त्य साईबाबा आशीर्वाद देऊ शकत नाहीत. साईबाबांची घरात पूजा होऊ शकते मात्र मंदिरात नाही. काशीतील तब्बल 14 मंदिरांमधून साईंच्या मूर्ती हटवल्या आहेत. काशीतील सर्व साईबाबा मूर्तींचं गंगा नदीत विसर्जन झालं आहे.

वाराणसीत साईंच्या मूर्ती हटवल्याने साई भक्तांमध्ये संतापाची लाट उसळलीय. तर साईबाबा हे सर्व धर्माचे प्रतिक होते. त्यांची पुजा कर्मकांडानुसार होत असल्याचं सांगत वाराणसीच्या घटनेवर साई संस्थानने तीव्र आक्षेप घेतलाय.

साईबाबांच्या मूर्तीपुजेवरून हा वाद पहिल्यांदाच झाला नाही तर याआधी शंकराचार्यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्ये

2014

सबका मालिक साई तर मग साईबाबांचा मालक कोण?- शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती

2023

साईबाबा देव नाहीत. त्यांची पूजा करू नये- बागेश्वर धाम

देशभरात साईभक्तांची संख्या मोठी आहे. त्यातच आता वाराणसीच्या घटनेमुळे साईभक्तांच्या श्रद्धा दुखावल्या गेल्यानं काशीतल्या कृत्याचा साईभक्तांकडून निषेध केला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Scheme: स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! ४०० दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणुकीचा कालावधी वाढवला

Nitrogen Smoke Biscuit : सावधान! तोंडातून धूर सोडणारी बिस्किटे खाताय? जडतील गंभीर आजार, पाहा VIDEO

New Internship Scheme: लाडक्या बहिणीनंतर आता भावांचा नंबर, तरुणांना दर महिन्याला मिळणार ५००० रुपये; जाणून घ्या कसे?

Hingoli News : मिटिंग सुरु असताना हृदयविकाराचा झटका, महावितरणच्या अभियंत्याचा जागीच मृत्यू; हिंगोलीत खळबळ

Heavy Rain Alert : महाराष्ट्रासह ९ राज्यांत आज पावसाचा इशारा; वाचा कुठे कुठे कोसळणार पाऊस

SCROLL FOR NEXT