Subrata Roy  Social media
देश विदेश

Subrata Roy Passed Away: सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे निधन

Subrata Roy : सुब्रत रॉय यांनी १९७८ मध्ये आपल्या एका मित्रासोबत स्कूटरवर बिस्किटे आणि नमकीन विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता.

Bharat Jadhav

Subrata Roy Passed Away:

सहारा इंडियाचे प्रमुख सुब्रत रॉय यांचे मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. मुंबईतील कोकिला बेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुब्रत रॉय हे सहारा इंडिया परिवारचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष होते. 'सहाराश्री' या नावानेही ओळखले जायचे. त्यांनी १९७८ मध्ये सहारा इंडिया परिवाराची स्थापना केली. त्यांच्या निधनावर समाजवादी पक्षासह इतर राजकीय पक्षांनी शोक व्यक्त केला आहे.(Latest News)

सुब्रत रॉय हे बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील रहिवाशी होते. त्यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण कोलकता येथे पूर्ण केलं. त्यानंतर ते गोरखपूर येथे गेले. तेथे त्यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ घालवला. तेथे त्यांनी १९७८ मध्ये आपल्या एका मित्रासोबत एका स्कूटरवर बिस्किट आणि नमकीन विकण्याचा व्यवसाय सुरू केला. तेथून त्यांनी २ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक होण्याचा त्याचा प्रवास सुरू झाला.

सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त एक स्कूटर, एक दोन खुर्ची होती. एका मित्रासोबत त्यांनी चिटफंड कंपनी सुरू केली. त्यांनी पॅरा बँकिंग सुरू केली. त्यासाठी त्यांनी गरीब आणि मध्यमवर्गीयांना आपलं ग्राहक बनवलं. त्यांच्या या चिटफंडमध्ये अनेक लोकांनी गुंतवणूक केलीय. दिवासभरात शंभर रुपायांची कमाई करणारा व्यक्तीही त्यांच्याकडे २० रुपयांची गुतंवणूक करत होता. असं करत-करत देशातील लाखो लोकांनी त्यांच्या चिटफंडमध्ये गुंतवणूक केली होती.

सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर समाजवादी पक्षाने दुख व्यक्त केलंय. एक्स या सोशल मीडियाच्या साईटवर पोस्ट करताना लिहिलंय की, सुब्रत रॉयजी यांचं निधन झालं. त्यामुळे अत्यंत दु:ख होत आहे. देव त्यांच्या आत्माला शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांना दुख पेलण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही सुब्रत रॉय यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. एक्सवर पोस्ट करताना त्यांनी लिहिलंय की, सुब्रत रॉयजी यांचे निधन होणं हे उत्तर प्रदेश आणि देशाचं भावनिक नुकसान झालंय. कारण ते यशस्वी व्यावसायिक होते शिवाय संवेदनशील हृदय असलेले व्यक्तीही होते. असंख्य लोकांसाठी ते सहारा बनले होते. भावपूर्ण श्रद्धांजली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रेल्वेच्या धडकेने दोघांचा मृत्यू,पंढरपूरमधील घटना

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

SCROLL FOR NEXT